महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सहाबहार गाण्यातून नेहा कक्करने केले 'जनता कर्फ्यू'चे आवाहन

प्रेम आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा, अफवा पसरवू नका, असा सल्लाही तिने या व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे.

By

Published : Mar 21, 2020, 5:22 PM IST

Neha Kakkar Appeal for Janta Curfew, watch video
सहाबहार गाण्यातून नेहा कक्करने केले 'जनता कर्फ्यू'चे आवाहन

मुंबई -कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याने अनेक सेलेब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना खबरदारी पाळण्याचे आवाहन करत आहेत. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करनेही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट करत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी तिने एक सदाबहार गाणेदेखील गायले आहे.

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात येत आहे. नेहानेही आपल्या व्हिडिओतून नागरिकांना स्वत: ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, घरातील ज्येष्ठ व्यक्तींची विशेष काळजी घेण्याचेही तिने या व्हिडिओत म्हटले आहे.

हेही वाचा -कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिने तारे-तारकांचं आवाहन

प्रेम आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा, अफवा पसरवू नका, असा सल्लाही तिने या व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे.

नेहाशिवाय विविध बॉलिवूड सेलिब्रेटींसोबतच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उद्या म्हणजे २२ मार्च रविवारी पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे तिने आपल्या व्हिडिओतून म्हटले आहे.

हेही वाचा -COVID-19 : कार्तिक आर्यनची हटके स्टाईलमध्ये जनजागृती, पाहा कलाकारांचे व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details