महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गावागावातील जातीच्या वाड्यांची हिंसक व्यवस्था बदलावी लागेल - नागराज मंजुळे - Annabhau Sathe Sahitya Sammelan, Vategaon

सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त, ३१ वे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन, वाटेगाव भरवण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नामवंत दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित होते.

nagraj-manjule-in-sahitya-sammelan
नागराज मंजुळे

By

Published : Mar 2, 2020, 10:22 PM IST

अण्णा भाऊ साठे यांनी जातीभेदाच्या भिंती पार करून लिखाण केले होते. परंतु सध्या जाती भेद वाढला आहे. अण्णांच्या लावणीतील मैना या अगोदरच पडद्यावर यायला हवी होती. अण्णांनी वाटेगाव सारख्या अत्यंत खेडे गावात जन्म घेतला पण अवघ्या विश्वभर गावाचे व स्वतःचे नाव लौकिक केले. सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निम्मित वाळवे तालुक्यातील त्यांच्या जन्म गाव वाटेगाव येथे ३१ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलन अध्यक्ष म्हणून चित्रपट निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्तथत होते.

३१ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नामवंत दिग्दर्शक नागराज मंजुळे

अजूनही गावात जातिनिहाय वाडे किंवा वस्त्या टिकून आहेत. गावागावातील जातीचे वाडे ही हिंसक व्यवस्था बदलावी लागेल, ती सुद्धा एक प्रकारे हिंसाच आहे. ज्याचं शोषण होत ते दलित असतात, आणि जगातील अर्धी लोकसंख्या असलेल्या महिला ह्याच खऱ्या अर्थाने दलित आणि उपेक्षित आहेत. कारण अजून ही त्यांचं शोषण होत आहे. जातीवरून व कोणत्याही बारीकसारीक गोष्टीवरून हिणवणे सुद्धा हिंसाच आहे. आणि अशाच सतत जातीवरून चिडवणे व प्रत्येक कामामध्ये हिणवल्या मुळेच फॅन्ड्रीमध्ये जब्याने दगड मारला होता. तर काही लोकांनी मी हिंसाचाराला खत पाणी घालतो का असा प्रश्न केला होता. जब्याला झालेला मानसिक त्रास याच्या विरुद्ध त्याचा राग होता. अण्णांच्या कादंबऱ्या वाचूनच मला प्रेरणा मिळते. सध्या समाजात प्रेमाने वागा प्रेमच मिळेल. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या पुन्हा प्रकाशित व्हाव्यात. आताच्या पिढीला आण्णाभाऊ समजणें गरजेचे असल्याचे मत सिनेदिग्दर्शक व निर्माते नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. ते वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निम्मित घेण्यात आलेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

मंजूळे पुढे म्हणाले, महाराष्ट्रात अनेक थोर पुरुषांनी समाज घडण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पण आपणच त्यांना त्यांच्या जातीमध्ये अडकून ठेवले आहे. आंबेडकर, अण्णाभाऊ हे जातीपातीच्या पुढे गेले होते. यामुळे अण्णाभाऊ हे वाटेगावचे असल्याचा अभिमान फक्त समाजाला नसून संपूर्ण गावाला असायला पाहिजे. प्रत्येकाने जाती पातीच्या पलीकडे जाऊन काम करायला हवे.

साहित्य संमेलनचे उदघाटन डॉ. कवी विठ्ठल वाघ याच्या हस्ते झाले. आपली राज्य सत्ता ही घडयाळयाचे काटे उलटे फिरवत आहे. धर्मांधता पुन्हा आपल्यावर लाधली जात आहे. सर्वांनी जागरूक असणे गरजेचे आहे. आण्णाभाऊ साठे यांच्या सारख्या महान व्यक्तींना एका विशिष्ट जातीत अडकवणारे, हरामखोर आंधळले आहेत, असे डॉ. कवी विठ्ठल वाघ म्हणाले. स्वागत प्रा.मच्छिन्द्र सकटे यांनी केले तर आभार दि. बा. पाटील यांनी आभार मानले. अण्णाच्या पावन भूमी मध्ये साहित्य संमेलन घेतल्याने खूप समाधान होत असल्याचे दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ.विजय चोरमारे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details