महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'परीस'च्या ‘गूढ' गाण्यासोबतच संगीताची पण होतेय चर्चा!

ग्रामीण कथेवर आधारित रहस्यमय 'परीस' नावाची वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रदर्शित झाली असून तिला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेच्या संगीताबद्दलही बरीच चर्चा होतेय.

By

Published : Sep 7, 2021, 10:45 PM IST

ग्रामीण कथेवर आधारित रहस्यमय 'परीस'
ग्रामीण कथेवर आधारित रहस्यमय 'परीस'

काही दिवसांपूर्वी जगभरातील प्रेक्षकांची लाडकी धक धक गर्ल माधुरी दीक्षितच्या हस्ते प्लॅनेट मराठी ओटीटी ऍप चे अनावरण झाले होते. आता प्लॅनेट मराठी ची टीम जोमाने कामाला लागली असून नुकतीच त्यांनी ‘परीस’ ही वेब सिरीज प्रदर्शित केली. ग्रामीण कथेवर आधारित रहस्यमय 'परीस' नावाची वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रदर्शित झाली असून तिला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेच्या संगीताबद्दलही बरीच चर्चा होतेय.

लोखंडास परीसाचा स्पर्श झाल्यास त्याचे सोने होते. ही गोष्ट गावातील काही लोकांना समजते आणि ते परीसाच्या शोधात निघतात. या शोधादरम्यान एका तरुण - तरुणीचे एकमेकांवर प्रेम जडते. त्यांच्या या प्रेमाचा प्रवास आपल्याला 'गूढ' या प्रेमगीतामधून पाहायला मिळतो. त्यांना तो परीस सापडतो का, तो मिळवण्यासाठी ते कोणत्या थराला जातात?, त्या जोडप्याचे पुढे काय होते, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं 'परीस' मधून मनोरंजक रीतीने देण्यात आली आहेत.

या वेबसिरीज मधील 'गूढ' हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे बोल आणि संगीत निरंजन पेडगावकर यांचे असून जयदिप वैद्य यांनी हे गाणे गायले आहे. ग्रामीण कथा असलेल्या ‘परीस’मधील या गाण्याचे बोल अतिशय श्रवणीय असून यातील ग्रामीण लहेजा आणि गावरान शब्द विशेष लक्षवेधी आहेत.

‘परीस’ मधील 'गूढ' या गाण्याबद्दल ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले की, ''या गाण्याचे बोल ग्रामीण असल्यामुळे हे एक वेगळ्या धाटणीचे गाणे बनले आहे. या गाण्याचा एक वेगळाच बाज असून जयदीप वैद्य याने अतिशय सुंदर पद्धतीने ते गायले आहे. अंधश्रद्धेवर आधारित 'परीस' मधील 'गूढ' हे प्रेमगीत प्रदर्शित झाले आहे. अतिशय सुमधूर असे हे प्रेमगीत आहे. आगामी काळात अनेक नवनवीन वेबसिरीज व वेबफिल्म्स 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रदर्शित होणार आहेत."

हेही वाचा - पुण्यातील युवकांनी रस्त्यांवर येऊन ‘मनी हाईस्ट' स्टाईलने लस घेण्याचं केले आवाहन!

ABOUT THE AUTHOR

...view details