महाराष्ट्र

maharashtra

मंगळसूत्राच्या विवादित जाहिरातीबाबत प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीला कायदेशीर नोटीस

कील आशुतोष दुबे यांनी प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांना सोशल मीडियावर मंगळसूत्रा संदर्भात केलेल्या एका जाहिरातीबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या जाहिरातीत अंतर्वस्त्र परिधान केलेल्या मॉडेल्स जिव्हाळ्याच्या पोझिशनमध्ये राहुन मंगळसूत्राची जाहिरात करीत असून अशा प्रकारच्या जाहिरातीमुळे हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या आरोप करत सब्यसाची यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

By

Published : Oct 30, 2021, 9:24 PM IST

Published : Oct 30, 2021, 9:24 PM IST

ETV Bharat / sitara

मंगळसूत्राच्या विवादित जाहिरातीबाबत प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीला कायदेशीर नोटीस

सब्यसाची मुखर्जीला कायदेशीर नोटीस
सब्यसाची मुखर्जीला कायदेशीर नोटीस

पालघर - डहाणू येथील भाजपाचे कायदेविषयक सल्लागार असलेले वकील आशुतोष दुबे यांनी प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांना सोशल मीडियावर मंगळसूत्रा संदर्भात केलेल्या एका जाहिरातीबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या जाहिरातीत अंतर्वस्त्र परिधान केलेल्या मॉडेल्स जिव्हाळ्याच्या पोझिशनमध्ये राहुन मंगळसूत्राची जाहिरात करीत असून अशा प्रकारच्या जाहिरातीमुळे हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या आरोप करत सब्यसाची यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

सब्यसाची मुखर्जीला कायदेशीर नोटीस

मंगळसूत्राच्या जाहिरातीसाठी अर्धनग्न मॉडेल वापरल्याने भावना दुखावल्याचा आरोप

प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी त्यांच्या नवीन मंगळसूत्र कलेक्शनमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. सब्यसाची मुखर्जीने त्यांच्या इंस्टाग्रामवर लेटेस्ट डिझाइन मंगळसूत्राचा फोटो शेअर केला आहे. फॅशन डिझायनरच्या मॉडेलने डेनिम आणि अंतर्वस्त्र परिधान करून फोटो सेशन केले आहे, जे सोशल मीडिया वापरकर्त्यांना आवडले नाहीत. लग्नाच्या पवित्र बंधनाचे प्रतिक आणि लग्नाचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या मंगळसूत्राचे नवे कलेक्शन लॉंच करण्यासाठी त्याने ज्या प्रकारच्या जाहिरातीचा अवलंब केला आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे डिझायनर सब्यसाची मुखर्जी याना कायदेशीर नोटीस धाडण्यात आली आहे.

सब्यसाची मुखर्जीला कायदेशीर नोटीस

फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीला कायदेशीर नोटीस

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील रहिवासी असलेले भाजप पालघरचे कायदे विषयक सल्लागार वकील आशुतोष दुबे यांनी प्रसिद्ध डिझायनर सब्यासाची मुखर्जी यांना ही नोटीस पाठवली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून याबद्दल पोस्ट केली आहे. “मी सब्यसाची मुखर्जी या भारतीय फॅशन डिझायनरला “मंगळसूत्र” पवित्र हिंदू विवाहाचा भाग असल्याने “मंगळसूत्र कलेक्शनच्या जाहिरातीसाठी अर्ध-नग्न मॉडेल वापरण्याबाबत कायदेशीर नोटीस बजावली आहे. “ त्याचप्रमाणे 15 दिवसांच्या आत ही जाहिरात मागे घेण्याची व याबाबत सार्वजनिक रित्या याबाबत माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा - #Puneeth Rajkumar : पुनीत राजकुमारनेही केले नेत्रदान, जपला आई वडिलांचा अनोखा वारसा

ABOUT THE AUTHOR

...view details