महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सोनी मराठी घरबसल्या देणार 'लाफ्टर स्टार' होण्याची संधी!

सोनी मराठी वाहिनी एक विनोदी कार्यक्रम घेऊन येत आहे, ज्याचे नाव आहे 'लाफ्टर स्टार'! या कार्यक्रमाची खासियत अशी की, यामध्ये सामान्य माणसाला आपली कला सादर करता येणार आहे. प्रसिद्धी मिळवण्याची संधी यामुळे अनेक होतकरूंना मिळणार आहे.

By

Published : Jun 20, 2020, 2:34 PM IST

Lafter_Star
लाफ्टर स्टार

मुंबई - सोनी मराठी वाहिनी असाच एक विनोदाने परिपूर्ण कार्यक्रम घेऊन येत आहे, ज्याचे नाव आहे 'लाफ्टर स्टार'! या कार्यक्रमाची खासियत अशी की, यामध्ये सामान्य माणसाला आपली कला सादर करता येणार आहे.

हेही वाचा - सोनू निगमने दिला धोक्याचा इशारा : म्यूझिक इंडस्ट्रीतूनही येऊ शकते आत्महत्येची बातमी, पाहा व्हिडिओ

विनोद हा मनोरंजनाचा अविभाज्य भाग आहे. नऊ रसांपैकी एक महत्त्वाचा रस म्हणजे 'हास्यरस'! इंग्लिशमध्ये एक म्हण आहे 'लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन' आणि म्हणूनच प्रत्येकाने हासत राहणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या हसण्याची जबाबदारी गेली अनेक दशके मनोरंजन सृष्टी घेत आहे. या अनेक दशकांमध्ये विनोदाची परिभाषा बदलली आहे. अनेक विनोदवीरांचा त्यात मोलाचा वाटा आहे. चार्ली चॅप्लिनने जगाला दाखवलेला मूक विनोद असो किंवा दादा कोंडकेंचे धमाल विनोद! पुढच्या काळात अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीने आपल्या अफलातून अभिनयाने विनोदाची परिभाषा बदलून संवादशैली आणि देहबोली यांच्या मदतीने विनोद कसा खुलवता येतो, हे दाखवले. मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत, सिद्धार्थ जाधव यांनीही विनोदाचे नवीन अंग प्रेक्षकांना दाखवले. या सगळ्यांत विनोदात बदल होत गेले आणि विनोदाचे अनेक पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत

हेही वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरणी रियाची ९ तास चौकशी, 'या' गोष्टींचा झाला खुलासा!

गायक, नृत्य, अभिनेता या सर्वांसाठी मंच आहेत, पण आपल्या विनोदाने इतरांना हासवणाऱ्या विनोदवीरांसाठी सोनी मराठी वाहिनी हा कार्यक्रम घेऊन आली आहे.'लाफ्टर स्टार' कार्यक्रमामुळे प्रसिद्धी मिळवण्याची संधी यामुळे अनेक होतकरूंना मिळणार आहे. अट फक्त एकच तुम्हाला समोरच्याला हासवता आले पाहिजे. आपला एक मिनिटाचा व्हीडिओ रेकॉर्ड करून सोनी लिव्ह या अॅपद्वारे पाठवायचा आहे. लवकरच हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details