महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

लता मंगेशकर यांनी 'एसीपी प्रद्युम्न'वर जेव्हा रोखली होती पिस्तुल !!!

महान गायिका लता मंगेशकर यांनी सीआयडी मालिका फेम एसीपी प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम यांचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. साठम यांचा २१ एप्रिल रोजी ७० वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने लतादिदिंनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

By

Published : Apr 22, 2020, 7:09 PM IST

Lata mangeshkar
लता मंगेशकर

मुंबई - लॉकडाऊननंतर अनेक जुन्या मालिका टीव्हीवर पुन्हा दाखवल्या जात आहेत. सोनी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका सीआयडीदेखील पुन्हा प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेत एसीपी प्रद्युम्न ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या शिवाजी साठम यांचा ७० वा वाढदिवस काल २१ एप्रिलला साजरा झाला. या निमित्ताने लता मंगेशकर यांनी त्यांचा जुना फोटो शेअर करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटोसह लता मंगेशकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ''नमस्कार, सीआयडी मालिकेतील एसीपी प्रद्युम्न, शिवाजीराव साटम यांचा वाढदिवस आहे. मी त्यांना खूप शुभेच्छा देते आणि पुन्हा सीआयडी सुरू होत असल्याबद्दल सदिच्छा देते.''

लता मंगेशकर यांनी शेअर केलेल्या जुन्या फोटोमध्ये त्यांच्या हातामध्ये बंदुक असून ती शिवाजी साठम यांच्यावर रोखल्याचे दिसते. सीआयडी टीमसोबतचा हा सर्वात आवडता फोटो असल्याचे मंगेशकर यांनी म्हटलंय.

शिवाजी साठम यांनी सीआयडीसोबतच असंख्य मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले साठम हे सीआयडीमुळे सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details