मुंबई - दिग्दर्शक करण जोहरच्या आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेला 'कभी खुशी कभी गम' हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. २००१ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, करण जोहरने या चित्रपटाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. हा चित्रपट माझ्या चेहऱ्यावर एक जोरदार चपराक होती, असे तो या चित्रपटाबाबत म्हणाला आहे.
होय, करण जोहरने या चित्रपटाबद्दल सांगितले, की मी 'मुगल -ए- आझम', 'लगान' आणि 'दिल चाहता है' यांसारखा चित्रपट तयार करत असल्याचा विचार केला होता'.
हेही वाचा -आयुष्मान खुरानाची पुन्हा धमाल, पाहा 'शुभ मंगल ज्यादा सावधान'चा ट्रेलर
यामध्ये मोठी स्टारकास्ट असावी, हा करण जोहरचा मुख्य उद्देश होता. मात्र, या चित्रपटाने मला सत्य परिस्थितीचा सामना करायला शिकवले. हा चित्रपट मला मिळालेली जोरदार चपराक होती.
कुटुंबीय चित्रपटाच्या जॉनरमध्ये बसणाऱ्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन आणि करिना कपूर यांसारखे मोठे कलाकार झळकले होते. यामध्ये राणी मुखर्जीचीही छोटी भूमिका होती. मात्र, या चित्रपटाला समिक्षकांकडून वाईट प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. त्यांच्या या प्रतिक्रियांमुळे करण जोहरला धक्का बसला होता.
हेही वाचा -'झुंड' चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये महानायकाची दमदार झलक, पाहा फोटो