मुंबई- करण जोहरने आपल्या आगामी 'अजीब दास्तां' चित्रपटाचा टिझर रिलीज केला आहे. ५८ -सेकंदाच्या या टिझरमध्ये असामान्य आणि अनपेक्षित कथांची एक झलक पाहायला मिळते.
'अजीब दास्तां'मध्ये चार प्रतिभावान दिग्दर्शकांच्या कथा पाहायला मिळतील. या चारही कथा विचित्र असून वास्तवापेक्षा अनोळख्या असल्याचे करण जोहरने आपल्या ट्विटरवर म्हटले आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या टिझरमध्ये फातिमा सना शेख, जयदीप अहलावत, नुसरत भरुचा, अभिषेक बॅनर्जी, इनायत वर्मा, कोंकणा सेन शर्मा, आदिती राव हैदरी, शेफाली शाह, मानव कौल आणि तोटा रॉय चौधरी यांच्या चार विविध कथा आहेत.
या चित्रपटाचे अगोदरचे शीर्षक 'द अदर' असे होते. आता ते बदलून 'अजीब दास्तां' करण्यात आले असून यात चार शॉर्ट फिल्म्सचा समावेश करण्यात आलाय. या चार कथांचा कोलाज शशांक खेतान, राज मेहता, नीरज घायवान आणि कायोज इराणी यांनी दिग्दर्शित केला आहे.
देशातील उत्कृष्ट प्रतिभेच्या सहकार्याने, 'अजीब दास्तां' चित्रपटामध्ये मानवी दोष, ईर्ष्या, हक्क, पूर्वग्रह आणि विषारीपणा या भावनांचा शोध घेणाऱया चार विविध कथा दाखवण्यात आल्या आहेत. या चारही कथांच्या केंद्रस्थानी नातेसंबंध आहेत. अजीब दास्तां हा चित्रपट १६ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.
हेही वाचा - ‘द बिग बुल’ ट्रेलर : भारताचा पहिला अब्जाधिश बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाची कथा