महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

''मी देशद्रोही नाही, लक्षद्वीपला न्याय मिळेपर्यंत संघर्ष करेन'' - आयशा सुल्ताना

लक्षद्वीप बेटावर कोविड रुग्ण संख्येमध्ये अचानक वाढ झाल्याबद्दल अभिनेत्री आयशा सुल्तानाने एका चर्चेच्या वेळी स्थानिक प्रशासनाला 'बायो-वेपन' ('जैविक अस्त्र') म्हटले होते. त्यानंतर तिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयशा म्हणाली की निर्दोष आहे आणि मला न्याय मिळेल याची खात्री आहे. मी देशाविरूद्ध काहीही केले नाही. लक्षद्वीपला न्याय मिळेपर्यंत मी संघर्ष करीत राहीन., असे आयशा सुलताना हिने म्हटले आहे.

Aisha Sultana
आयशा सुल्ताना

By

Published : Jun 19, 2021, 8:28 PM IST

एर्नाकुलम- अलिकडेच लक्षद्वीप बेट समुहावर प्रशासक म्हणून प्रफुल खोडा पटेल यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी अधिकार मिळताच अनेकबदल करण्यास सुरूवात केली. याच दरम्यान बेटावर कोविड रुग्ण संख्येमध्ये अचानक वाढ झाल्याबद्दल चित्रपट निर्माती आणि सामाजिक कार्यकर्ती आयशा सुलताना हिने एका चर्चेच्या वेळी स्थानिक प्रशासनाला 'बायो-वेपन' ('जैविक अस्त्र') म्हटले होते. स्थानिक भाजपा नेते अब्दुल खादर हाजी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिच्याविरूद्ध कावरट्टी पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयशा सुलताना हिला उद्या लक्षद्वीप पोलिसांनी हजर राहण्यास सांगितले आहे. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आहे. मात्र हा गुन्हा चुकीचा नोंद झाला असून याबाबत बोलताना आयशा म्हणाली, ''लक्षद्वीपच्या पोलिसांना मी सहकार्य करीत आहे. त्यांनी मला उद्या हजर होण्यास सांगितले आहे. मला आशा आहे की मला न्याय मिळेल. मी देशाविरूद्ध काहीही केले नाही. लक्षद्वीपला न्याय मिळेपर्यंत मी संघर्ष करीत राहीन.''

आयशा सुल्तानावर का दाखल झाला देशद्रोहाचा गुन्हा?

टीव्ही शोमधील चर्चेच्या वेळी आयशाने स्थानिक प्रशासनाला 'बायो-वेपन' ('जैविक अस्त्र') म्हटले होते. अलिकडेच लक्षद्वीप बेट समुह प्रशासक प्रफुल खोडा पटेल यांच्या प्रशासनातील बदलांच्या पार्श्वभूमीवर हे विधान तिने केले होते. सुलताना हिने आपल्या या वक्तव्याचा बचाव केला होता. ती म्हणाली, की तिचे हे म्हणणे पटेल प्रशासनाच्या निर्णयावर आधारित आहे, देशाविषयी नाही.

"लक्षद्वीपवर कोविड -१९ची शून्य प्रकरणे होती. आता दररोज १०० प्रकरणांची नोंद होत आहे. असे आयशा सुलताना मल्याळम टीव्हीवरील चर्चेदरम्यान म्हणाली होती," असे अहवालात म्हटले आहे. तिच्या या विधानानंर स्थानिक भाजपा नेते अब्दुल खादर हाजी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिच्याविरूद्ध कावरट्टी पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्षद्वीप बेटावर सुरू झालेल्या नव्या सुधारणांविरूद्धच्या मोहिमेमध्ये अभिनेत्री आयेशा सुल्तानाने भाग घेतला असून ती यासाठी सक्रिय बनली होती.

आयशा सुलताना कोण आहे?

आयशा सुल्ताना एक मॉडेल, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे. लक्षद्वीप बेटाच्या इतिहासातील ती पहिली महिला चित्रपट निर्माती आहे.मीडिया रिपोर्टनुसार, मल्याळम भाषेतील 'फ्लश' हा चित्रपट २०२० मध्ये आलेला एक स्वतंत्र दिग्दर्शिका म्हणून तिचा पहिला चित्रपट होता.सुल्तानाने लाल जोसेसह अनेक मल्याळम चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले आहे. तिने 'केट्टिओलानु एन्टे मालाखा' या चित्रपटात सह-दिग्दर्शिका म्हणूनही काम केले होते.“माझी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आलेली आणखी एक व्यक्ती आता स्वतंत्र चित्रपट निर्मिती करत आहे. यावेळी लक्षद्वीपची आयशा सुल्ताना ही एक मुलगी आहे. तिच्या फ्लॅश चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना मला आनंद झाला आहे,” असे लाल जोसे यावेळी म्हणाले होते.

अलिकडेच एका स्थानिक बातमीमुळे आयेशा सुल्ताना चर्चेत आली होती. चित्रपट दिग्दर्शिका गीतू मोहनदास आणि महिला वेशभूषा डिझायनर स्टेफी झेवियर यांच्यातील वादात आयशाने स्टेफीचे समर्थन केले होते. त्यानंतर गीतू यांनी स्टेफीला आपल्या सिनेमातून डच्चू दिला होता आणि आयशाने तिला आपल्या फ्लश या चित्रपटासाठी साईन केले होते.

हेही वाचा - 'स्कॅम १९९२' स्टार प्रतीक गांधीसोबत चित्रपटात रोमान्स करणार विद्या बालन

ABOUT THE AUTHOR

...view details