मुंबई - बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेला टीव्ही अभिनेता गौरव दीक्षित याला स्थानिक न्यायालयाने ५०,०००रुपयांच्या जामिनावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, तो परवानगीशिवाय शहराबाहेर जाऊ शकत नाहीत. या प्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत गौरवला प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी एनसीबी कार्यालयात अहवाल द्यावा लागेल. यापूर्वी एनसीबीने गौरवच्या सांगण्यावरून मुलुंड, खारघर, वसई, विरार, वांद्रे आणि अंधेरी भागात छापे टाकले होते.
ड्रग पॅडलरने साक्ष दिल्यानंतर ही अटक करण्यात आली