महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पंतप्रधानांना SC पाठोपाठ EC चा धक्का.. 'मोदी' बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती

या चित्रपटातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. मात्र, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास हा आचासंहितेचा भंग असेल, असे सांगत विरोधकांनी आक्षेप घेतला होता केला होता

'मोदी' बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती

By

Published : Apr 10, 2019, 3:17 PM IST

मुंबई- 'पीएम मोदी' बायोपिकच्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगानं स्थगिती दिली आहे. निवडणुकांच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास हा आचारसंहितेचा भंग असेल, असे सांगत निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मोदींच्या जीवनावर आधारित हा चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता हे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे.

या चित्रपटातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. मात्र, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास हा आचासंहितेचा भंग असेल, असे सांगत विरोधकांनी आक्षेप घेतला होता केला होता. यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली होती. ही याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपावला होता. आता निवडणूक आयोगाने या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details