मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नु आणि भूमी पेडणेकर दोघीही लवकरच एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. 'सांड की आँख' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात त्या दोघीही शार्पशूटर चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. अलिकडेच या दोघींच्याही जीवनावर प्रकाश टाकणारा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओनंतर आता तापसी पन्नु आणि भूमी पेडणेकर यांचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
'तन बुढा होता है, मन बुढा नही होता', असे कॅप्शन देत तापसी आणि भूमीचा पहिला लूक असलेला फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये दोघीही वृद्ध अवतारात दिसत आहेत. दोघींच्याही हातात बंदुक घेतलेली आहे. तर, चंद्रो आणि प्रकाशी यांच्या ड्रेसींग स्टाईलमध्येच दोघींचाही लूक प्रदर्शित करण्यात आलाय. या चित्रपटातून दोघीही महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळतील.