महाराष्ट्र

maharashtra

इंडियन आयडॉल २०२० मध्ये धर्मेंद्र आणि आशा पारेखचा ‘ओल्ड स्कूल’ रोमान्स !

इंडियन आयडॉल २०२० च्या या वीकएंडला इंडियन आयडॉलच्या प्रेक्षकांसाठी एक सर्प्राइज असणार आहे. त्यांना त्यांची एक आवडती जोडी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर इंडियन आयडॉलच्या सेट्सवर प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. धर्मेंद्र आणि आशा पारेख सेट्सवर मौज-मजा-मस्ती करताना दिसतील.

By

Published : Feb 17, 2021, 7:07 PM IST

Published : Feb 17, 2021, 7:07 PM IST

Breaking News

मुंबई - जेष्ठांचा मान राखणे आपल्या संस्कृतीतच भाग आहे. त्यानुसार आपल्या चित्रपटसृष्टीत गतकाळाच्या स्टार्स-सुपरस्टार्स ना अतिशय मानाने वागवतात. सध्या अनेक रियालिटी शोज सुरु असून त्यांच्या एपिसोड्समध्ये चित्रपटसृष्टीतील मान्यवरांना बोलावून त्यांचे आदरातिथ्य केले जाते व त्यांच्या अनुभवातून नवीन पिढीला जगण्याचा नवीन मंत्र सापडतो. सध्या सुरु असलेल्या इंडियन आयडॉल २०२० च्या या वीकएंडला इंडियन आयडॉलच्या प्रेक्षकांसाठी एक सर्प्राइज असणार आहे. त्यांना त्यांची एक आवडती जोडी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर इंडियन आयडॉलच्या सेट्सवर प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. धर्मेंद्र आणि आशा पारेख सेट्सवर मौज-मजा-मस्ती करताना दिसतील. तसेच ते आपली कारकीर्द, वैयक्तिक जीवनविषयक आणि इतरही अनेक रंजक किस्से सांगतील.

होस्ट आदित्य नारायण ाणि आशा पारेख
धर्मेंद्र आणि आशा पारेख यांनी नायक-नायिका म्हणून एकत्र नऊ चित्रपट केलेत. शिकार, मेरा गाव मेरा देश, आया सावन झूमके ही त्यातील काही नावं. त्यांच्या चित्रपटांतील गाणी भन्नाट लोकप्रिय होती व आजही त्या गाण्यांची गोडी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतेय. इंडियन आयडॉलच्या मंचावर आशीष आणि सायली यांनी ‘कल की हसीन’ आणि ‘ओ हसीना जुल्फों वाली’ ही गाणी सादर केली आणि ती या महान जोडीला समर्पित केली. त्या दोघांचे सर्वांनी खूप कौतुक केले आणि उभे राहून त्यांना मानवंदना दिली. धर्मेद्र म्हणाले, “मला तुमचा परफॉर्मन्स खूपच आवडला, ज्यात जोश आणि रंजकता पुरेपूर होती.” आशा पारेख त्याला पुस्ती जोडत म्हणाल्या, “हा एक अदभूत परफॉर्मन्स होता, जो ऐकून मी अगदी दंग झाले.”
धर्मेंद्र आणि आशा पारेख
होस्ट आदित्य नारायणच्या आग्रहावरून धर्मेंद्र आणि आशा पारेख यांनी त्यांचे “सुनो सजना पपीहे ने” हे लोकप्रिय गीत पुन्हा साकारले. ते पाहताना सर्व जण जुन्या सुरेल आठवणीत रमले व त्यांनी हा परफॉर्मन्स उचलून धरला. धर्मेंद्र आणि आशा पारेखचा ‘ओल्ड स्कूल’ रोमान्स इंडियन आयडॉल २०२० च्या मंचावर गाजला व सर्वांनी ‘स्टँडिंग ओव्हेशन’ दिले. हे पाहून दोघेही थोडे भावनाविवश झाले.
धर्मेंद्र आणि आशा पारेख
इंडियन आयडॉल २०२० सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर दर वीकएंडला रात्री ८ वाजता प्रसारित होतो.

ABOUT THE AUTHOR

...view details