महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमला माझा पुरस्कार प्रदान

सर्वांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक करत महाराष्ट्राची हास्यजत्राच्या टिमला म्हणाले, ‘तुमचा विनोद सकारात्मकता निर्माण करत नैराश्यावर मात करतो.’ अशोक मुळ्ये यांच्या “माझा पुरस्कार’ उपक्रमाचे हे बारावे वर्ष होते. यंदाच्या या पुरस्कारांसाठी सोनी मराठी निर्मित ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्राची हास्यजत्रा
महाराष्ट्राची हास्यजत्रा

By

Published : Jul 9, 2021, 10:40 AM IST

मुंबई -कोरोना काळात अनेकजण नैराश्याचे शिकार झाले. घरीच बंदिस्त राहिल्यामुळे होणाऱ्या चिडचिडीतून, आर्थिक समस्यांमुळे होणाऱ्या चिडचिडीतून, भविष्याच्या काळजीमुळे होणाऱ्या चिडचिडीतून निराशा पसरलेली होती. लॉकडाऊनमध्ये एक विनोदी कार्यक्रम लोकांना खळखळून हसवत आजूबाजूची निगेटिव्हिटी विसरण्यासाठी मदत करत होता तो म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्राच्या टीमला ज्येष्ठ रंगकर्मी मुळ्येंचा ‘माझा पुरस्कार’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांसोबत हास्यजत्राची टीम
सर्वांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण वर्षा निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक करत महाराष्ट्राची हास्यजत्राच्या टिमला म्हणाले, ‘तुमचा विनोद सकारात्मकता निर्माण करत नैराश्यावर मात करतो.’ अशोक मुळ्ये यांच्या “माझा पुरस्कार’ उपक्रमाचे हे बारावे वर्ष होते. यंदाच्या या पुरस्कारांसाठी सोनी मराठी निर्मित ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांची निवड करण्यात आली.

विनोदामुळे सकारात्मकता
‘रोजच्या जगण्यातला विनोद हा निराशा दूर करून सकारात्मकता निर्माण करतो. कोविडनंतर दाटणारी निराशा दूर करण्याचे काम ‘हास्यजत्रा’ची टिम करत आहे. तुम्ही नेमक्या वेळी ज्या गोष्टीची जास्त गरज आहे, ते काम करत आहात’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या ‘माझा पुरस्कार’ विजेत्यांचे कौतुक केले. सनदी लेखापाल परीक्षेत देशात गुणवत्ता यादीत स्थान पटकावणाऱ्या अभिजित ताम्हणकर यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

माझा पुरस्कार प्रदान
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, तुम्ही मंडळी कोणते काम करता, त्याचे परिणाम काय होतात, हे महत्वाचे ठरते. संकटाचा काळ संपून गेल्यावर, मागे वळून पाहताना त्या कामाचे महत्व कळते. आता कोविडच्या संकटात दुसरी लाट ओसरतेय. तिसरी लाट येईल याची भिती आहे. दररोजच आम्ही त्याचा विचार करतो. निर्बंध कुणालाच आवडत नाही. पण निर्बंध, नियमावली यामुळे आणि आजारानंतर अनेकांना निराशा ग्रासते. त्यावेळी विनोदाचे महत्व पटते.”
माझा पुरस्कार प्रदान करताना

मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, नॉन फिक्शन हेड अमित फाळके, निर्माता दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासह हास्यजत्राच्या टिमधील वनिता खरात, दत्तात्रय मोरे, अमीर हडकर, चेतना भट, शिवाली परब, पृथ्वीक कांबळे, ओंकार राऊत, ओंकार भोजणे, पंढरीनाथ कांबळे आदी उपस्थित होते.

मनोरंजन क्षेत्रास पाठबळ देणार
‘यंत्राने आवाज करू नये. ते व्यवस्थित चालावे म्हणून आपण वंगण घालतो. त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या जगण्यात विनोद हे वंगणाचे काम करते. विनोद निर्मितीचे मोठे काम विनोदी लेखक, कलाकार करतात. सातत्याने हसविणे हे कठीण काम असते. नवनवीन सुचत राहणे अवघड असते. पण हे मोठे काम हास्यजत्राची टीम करते आहे. चांगले काम करणारे कलावंत आणि मनोरंजन क्षेत्राला नेहमीच पाठबळ दिले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते लेखक सचिन मोटे, निर्माता दिग्दर्शक सचिन गोस्वामी, लेखक-अभिनेते समीर चौगुले, लेखक-अभिनेते प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, नम्रता संभेराव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

हेही वाचा -सलमान खानसह ७ जणांवर कथित फसवणूक प्रकरणी समन्स

ABOUT THE AUTHOR

...view details