हल्लीच्या मालिकांमध्ये खाष्ट सासू आणि सोशिक सुना आता हद्दपार झाल्यागत आहेत. बदलत्या काळानुसार बऱ्याच मालिकांमध्ये सासू आणि सुनेचे प्रेमळ संबंध दाखविले जातात. सासूच जर सुनेची सखी झाली तर नात्यांचा गोडवा अधिकच वाढतो आणि घराचं गोकुळ होतं. अशाच एका गोड नात्याची कथा सांगणारी 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका झी मराठीवर आली आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर ह्या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडलेय. प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होताना दिसत आहे.
‘येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत ‘तू मी आणि पुरणपोळी’ चित्रपट रूपात!
'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत ‘तू मी आणि पुरणपोळी’ बघायला मिळणार आहे चित्रपट रूपात. झी मराठीवर याचे प्रसारण होईल.
सासरी माहेरचं वातावरण निर्माण करणं जरुरी आहे कारण सुखाचं-हक्काचं माहेर सोडून मुलगी एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करत असते. असं घर जे इथून पुढे तिचं होणार असतं. या प्रवासात तिला पतीची साथ असली तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची तिला कायमच उणीव भासत असते. ती उणीव जर सासरच्या घरात भरून निघाली तर सून सासरचा स्वर्ग करते. 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतही असेच घडेल अशी खात्री प्रेक्षक बाळगून आहेत. मालिकेतील नलू मावशी, दादा, चिन्या, शकू मावशी, मालविका, रॉकी ह्या पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.
'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत ‘तू मी आणि पुरणपोळी’ बघायला मिळणार आहे चित्रपट रूपात जो दिसेल झी मराठीवर.
हेही वाचा - जातीवाचक बोलल्याबद्दल अभिनेत्री मुनमुन दत्ता विरोधात मध्य प्रदेशात गुन्हा दाखल