महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गायिका व संगीतकार अमृता नातू घेऊन आलीय निसर्गावरील प्रेम व्यक्त करणारं गाणं ‘झिम्माड’!

‘झिम्माड’ हे श्रवणीय गीत सुचेता जोशी अभ्यंकर यांनी लिहिले असून अमृता नातूने ते संगीतबद्ध करून गायलं आहे. म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन आणि पोस्ट प्रोडक्शन अजिंक्य देशमुखनं केलं आहे. हो गाणे झी म्युझिक मराठीच्या यूट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आले आहे.

By

Published : Jul 22, 2021, 4:15 PM IST

Amrita Natu's 'Jhimmad'
गायिका व संगीतकार अमृता नातू

पर्जन्यऋतू हा रोमँटिक सिझन समजला जातो. त्यामुळे साहजिकच या काळात अनेक कविता आणि गाणी जन्मास येतात. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं सगळीकडे आता हिरव्या रंगाची उधळण आणि वातावरण प्रसन्न झालं आहे. कोरोनाचा प्रकोप बऱ्याच प्रमाणात निवळला आहे आणि आता लोकांना इतर गोष्टींकडे वेळ देण्यासाठी फुरसत मिळत आहे. या रोमँटिक ऋतूला शोभेल असं एक नवीन गाणं घेऊन आलीय अमृता नातू. या प्रसन्न वातावरणासारखंच आनंद देणारं, ‘झिम्माड’ हे श्रवणीय गीत नुकतेच ती घेऊन आलीय. तिनंच हे गाणं संगीतबद्ध करून गायलं आहे आणि ते झी म्युझिक मराठीच्या यूट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आले आहे.

‘झिम्माड’ या म्युझिक व्हिडिओविषयी गायिका-संगीतकार अमृता नातू म्हणाली, ‘सध्या पावसानं हिरवाई दाटली आहे, रिफ्रेशिंग वातावरण आहे. आतातरी नकारात्मक परिस्थिती असली तरी निसर्ग दरवर्षीप्रमाणेच प्रसन्न आहे. हे वातावरण शब्द, संगीत आणि छायांकनातून टिपलं आहे. त्यामुळे रसिकांना याच रिफ्रेशिंग वातावरणाचा अनुभव आणि आनंद देण्याचा प्रयत्न या म्युझिक व्हिडिओद्वारे केला आहे. हे गाणं सकारात्मकता पसरवणारं असून तरुणाईला जास्त भावेल.’

सुचेता जोशी अभ्यंकर यांच्या शब्दांना अमृतानं संगीतबद्ध करून गायलं आहे. म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन आणि पोस्ट प्रोडक्शन अजिंक्य देशमुखनं केलं आहे. संतोष नायर यांनी संगीत संयोजन, प्रोग्रॅमिंगची जबाबदारी निभावली आहे. अमृता नातूनं आतापर्यंत सिंगल म्युझिक व्हिडिओतून वेगवेगळ्या प्रकारची गाणी दिली आहेत. ‘झिम्माड’ हे गाणंही असंच श्रवणीय आणि आनंददायी आहे. उत्तम शब्द, रिफ्रेशिंग चाल, नेत्रसुखद छायांकन ही या म्युझिक व्हिडिओची वैशिष्ट्य आहेत.

गायिका व संगीतकार अमृता नातूचं ‘झिम्माड’ हे निसर्गावरील प्रेम व्यक्त करणारं गाणं असून रिफ्रेशिंग वातावरणाचा अनुभव देतं.

हेही वाचा - 23 जुलैला शिल्पाचा 'हंगामा 2' होणार प्रदर्शित; पती 'राज'मुळे करिअरला ब्रेक लागण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details