महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘देवमाणूस’ मालिकेत, अजित डिम्पलकडे देणार का सर्व गुन्ह्यांची कबुली?

ही मालिका सत्य घटनेवर आधारित आहे. आणि त्यात कुठल्याही काल्पनिक गोष्टी न भरता ही मालिका समाप्तीकडे सरकत आहे. यात आजवर अजितने केलेल्या सर्व गुन्ह्यांची कबुली तो डिम्पलकडे देणार आहे.

देवमाणूस
देवमाणूस

By

Published : May 30, 2021, 12:14 PM IST

मुंबई -कोणाच्याही चेहऱ्यावरून त्याचा स्वभाव ओळखता येत नाही. इतरांवर आंधळा विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा केसांनी गळा कापला गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु, माणसातील माणुसकी शाबूत आहे म्हणूनच हे जग सुरळीतपणे सुरु आहे. परंतु काही वेळा चेहऱ्यावर चांगुलपणाचा बुरखा ओढून काळी कृत्ये करणारी माणसेही आहेत. अशाच एका चांगुलपणाचा बुरखा ओढलेल्या ‘मेडिको’ च्या रक्ताने माखलेल्या चारित्र्याचा पर्दाफाश करणारी ‘देवमाणूस’ ही मालिका सत्य घटनांपासून प्रेरित आहे.

देवमाणूस - एक रंजक मर्डर मिस्ट्री
एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका देवमाणूस. एक बोगस डॉक्टर जोगावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भुरळ पाडतो. अल्पावधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. यात मध्यवर्ती भूमिकेत 'किरण गायकवाड' याने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.
‘देवमाणूस’
खरंतर ही मालिका सत्य घटनेवर आधारित आहे आणि त्यात कुठल्याही काल्पनिक गोष्टी न भरता ही मालिका समाप्तीकडे सरकत आहे. त्यामुळेच या मालिकेचा २ तासांचा विशेष भाग बनविण्यात आला असून त्यात रंजक मर्डर मिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ही मालिका एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. जसे डिम्पल आणि अजित ह्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे. आजवर अजितने केलेल्या सर्व गुन्ह्यांची कबुली डिम्पलकडे देणार आहे.
अजित डिम्पलचे लग्न होणार
तर या लग्नात दिव्या खोडा घालणार की सरू आज्जी राडा करणार, डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंगसोबत डिम्पल ला सुद्धा अटक होणार का आदी अनेक प्रश्नांच्या उत्तराची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेय. त्यासाठी त्यांना पाहावा लागेल ‘देवमाणूस - एक रंजक मर्डर मिस्ट्री!’ चा २ तासांचा विशेष भाग ३० मे रविवारसंध्या. ७ वा. झी मराठीवर.

ABOUT THE AUTHOR

...view details