महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 23, 2019, 8:53 PM IST

ETV Bharat / sitara

'तुला पाहते रे' मालिकेत लवकरच होणार 'राजनंदिनी'ची एन्ट्री!

अभिनेत्री शिल्पा तुळसकर ही राजनंदिनीची भूमिका साकारणार आहे. राजनंदिनीच्या रुपात ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'तुला पाहते रे' मालिकेत लवकरच होणार 'राजनंदिनी'ची एन्ट्री

मुंबई - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'तुला पाहते रे' या मालिकेत दिवसेंदिवस नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. विक्रांत आणि ईशाच्या प्रेमकहाणीने सुरुवात झालेली मालिका अल्पाधीतच टीआरपीच्या पहिल्या तीन स्थानकात पोहोचली आहे. सुबोध भावे आणि गायत्री दातार हे यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांचीही केमेस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत 'राजनंदिनी' या पात्राची एन्ट्री होणार आहे.


होय, मालिकेच्या शिर्षक गीतात 'राजनंदिंनी'ची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते. मात्र, हे तिचे गुपित नेमकं काय याबद्दल प्रेक्षकांना आतुरता आहे. अभिनेत्री शिल्पा तुळसकर ही राजनंदिनीची भूमिका साकारणार आहे. राजनंदिनीच्या रुपात ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


अलिकडेच या मालिकेच्या सेटवर होळीचा सण धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी सुबोध भावेसोबत शिल्पानेही चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता 'तुला पाहते रे' मालिकेत ती कशाप्रकारे एन्ट्री घेते, तिच्या येण्यामुळे मालिकेला कोणते वळण मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details