मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टला ( Actress Alia Bhatt ) प्राणी-अनुकूल फॅशन उद्योगाच्या समर्थनार्थ केलेल्या कामासाठी PETA ची 2021 सालची ( PETA India 2021) पर्सन ऑफ द इयर ( Person of the Year) म्हणून निवड करण्यात आली आहे. अभिनेत्रीने अलीकडेच फ्लेदरच्या मागे असलेल्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. ही कंपनी मंदिरात टाकलेल्या फुलांपासून शाकाहारी लेदर बनवते. याशिवाय, तिच्या शाकाहारी किडवेअर लाइन, ( Add-A-Mama ) एड-ए-मम्माने मुलांचे प्राणी आणि निसर्गाबद्दलचे प्रेम वाढवण्यासाठी 2021 चा PETA इंडिया फॅशन अवॉर्ड जिंकला आहे.
आलिया भट्ट मांजरी आणि कुत्र्यांच्या समर्थनार्थ वकिली करण्यासाठी ओळखली जाते आणि ती अनेकदा मजबूत प्राणी संरक्षण कायद्याची मागणी करण्यासाठी तिचा आवाज वापरते. अभिनेत्रीने मांजरी आणि कुत्र्यांना मदत करणाऱ्या अॅडॉप्ट पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (PETA) इंडिया मोहिमेत देखील काम केले आहे.