महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 19, 2022, 5:23 PM IST

ETV Bharat / sitara

‘अबोली’ ने गाठली शंभरी, जेष्ठ अभिनेता उदय टिकेकर घेताहेत एन्ट्री!

‘अबोली’ या मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिकेचा यापुढील प्रवासही तितकाच उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असेल. आता या मालिकेत अजून एक दमदार एंट्री होतेय, सुप्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर यांची.

उदय टिकेकर
उदय टिकेकर

स्टार प्रवाहवरील ‘अबोली’ ची गोष्ट आहे अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिकेचा यापुढील प्रवासही तितकाच उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असेल. अभिनेत्री गौरी कुलकर्णी अबोली ही व्यक्तिरेखा साकारत असून तिच्यासोबत सचित पाटील, प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, संदेश जाधव, अपर्णा अपराजित, अंगद म्हस्कर, दीप्ती लेले अशी दमदार कलाकारांची फौज आहे. आता या मालिकेत अजून एक दमदार एंट्री होतेय, सुप्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर यांची.

उदय टिकेकर

मालिकेत सध्या अबोलीच्या आयुष्यात बरीच उलथापालथ सुरू आहे. प्रतापरावांकडून झालेल्या अपमानानंतर अंकुशने अबोलीला घरच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. राहायला कुठेच आसरा नसल्यामुळे अबोलीने मंदिरात राहण्याचं ठरवलं आहे. अशातच मालिकेत डीसीपी किरण कुलकर्णी यांची एन्ट्री होणार आहे. अबोलीला पुन्हा अंकुशच्या घरात प्रवेश मिळावा यासाठी किरण कुलकर्णी प्रयत्न करतील का हे मालिकेच्या पुढील भागांतून समजेल.

‘अबोली’ ने गाठली शंभरी

सुप्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर किरण कुलकर्णी हे पात्र साकारणार आहेत. या पात्रविषयी सांगताना उदय टिकेकर म्हणाले, 'स्टार प्रवाहसोबत माझं खूप जुनं नातं आहे अगदी अग्निहोत्र पासून. अबोली मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा योग जुळून आला आहे. किरण कुलकर्णी हे पात्र अतिशय संवेदनशील आणि प्रेमळ आहे. त्याच्या येण्याने मालिकेत नेमकं काय घडणार याचा उलगडा होईलच पण हे पात्र प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.”

‘अबोली’ ही मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित होते.

हेही वाचा -कोणत्या निकषावर चित्रपट करमुक्त होतो? 'झुंड' निर्मातीचा सरकारला सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details