मुंबई - अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा विद्युत जामवाल काही महिन्यांपूर्वीच 'जंगली' चित्रपटात झळकला. 'कमांडो'चित्रपटानंतर त्याला 'कमांडो फेम'अशी ओळख मिळाली. या चित्रपटाचे आत्तापर्यंत दोन भाग प्रेक्षकांना पाहायला मिळाले. आता या चित्रपटाचा तिसरा भागही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची नवी प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
'कमांडो ३'मधून विद्युत पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नवी रिलीज डेट जाहीर
विद्युत जामवालने आत्तापर्यंत बऱ्याच अॅक्शन भूमिका साकारल्या आहेत. मात्र, 'कमांडो' चित्रपटातून त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यामुळेच या चित्रपटाला प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतो.
विद्युत जामवालने आत्तापर्यंत बऱ्याच अॅक्शन भूमिका साकारल्या आहेत. मात्र, 'कमांडो' चित्रपटातून त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यामुळेच या चित्रपटाला प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतो. आता या चित्रपटाचा तिसरा भाग ६ सप्टेंबर २०१९ रोजी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात विद्युतसोबत अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अंगीरा धर आणि गुलशन दैवेय्या हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.
विपुल अमृतल शाह यांची निर्मिती आणि रिलाएन्स एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त हे करत आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.