मुंबई -बॉलिवूड अभिनेता वरुण धवन लवकरच परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या अरुण खेतरपाल यांच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारणार आहे. सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल हे भारतीय सैन्यातील अधिकारी होते. १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातील बसंतरच्या लढाईमधील दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना 'परमवीर चक्र' हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान मरणोत्तर दिला गेला. त्यांची शौर्यगाथा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
या बायोपिकचं नाव अद्याप ठरलेलं नाही. मात्र, या बायोपिकसाठी दिग्दर्शक श्रीराम राघवन आणि निर्माते दिनेश विजन एकत्र येणार आहेत. दोघांनीही वरुण धवनसोबत 'बदलापूर' या चित्रपटासाठी काम केलं होतं.
हेही वाचा -'वॉर' चित्रपटाची विदेशातही क्रेझ, हृतिकच्या 'या' चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड