महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 22, 2022, 7:57 PM IST

ETV Bharat / sitara

‘पांघरूण' चित्रपटातील काळजाला भिडणारे 'साहवेना अनुराग' गाणे झाले प्रदर्शित!

महेश मांजरेकर ‘पांघरूण’ हा अजून एक चित्रपट घेऊन येताहेत जो प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘साहवेना अनुराग' हे काळजाला भिडणारे गाणे प्रदर्शित करण्यात आले. महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज घेऊन येत असलेल्या 'पांघरूण' या चित्रपटातील 'अनोखी गाठ' आणि 'इलुसा हा देह' ही दोन सुरेल गाणी यापूर्वी प्रदर्शित झाली आहेत.

‘पांघरूण'
‘पांघरूण'

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ नुकताच रिलीज झाला आणि वादग्रस्त ठरूनही त्याला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाला. त्यांच्या आधीच्या काकस्पर्श, नटसम्राट अशा सर्वोत्कृष्ट कलाकृतींना उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता महेश मांजरेकर ‘पांघरूण’ हा अजून एक चित्रपट घेऊन येताहेत जो प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘साहवेना अनुराग' हे काळजाला भिडणारे गाणे प्रदर्शित करण्यात आले. महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज घेऊन येत असलेल्या 'पांघरूण' या चित्रपटातील 'अनोखी गाठ' आणि 'इलुसा हा देह' ही दोन सुरेल गाणी यापूर्वी प्रदर्शित झाली आहेत.

या श्रवणीय गाण्यांना संगीतरसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील 'साहवेना अनुराग' हे मंत्रमुग्ध करणारे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला केतकी माटेगावकर हिचा सुमधुर आवाज लाभला असून या गाण्याचे बोल वैभव जोशी यांचे आहेत तर हितेश मोडक यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.
कला आणि प्रतिभेतून आलेला आवेश या गाण्यात चित्रित करण्यात आला आहे. नायिकेच्या मनातील भावना, घालमेल न बोलताही देहबोलीतून व्यक्त होत आहेत. हा सांगितिक खजिना प्रेक्षकांना नक्कीच भावेल.

पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटातील 'साहवेना अनुराग' या गाण्याचे बोल थेट काळजाला भिडणारे आहेत. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या ‘पांघरूण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून यात अमोल बावडेकर, गौरी इंगवले, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेखा तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुमधुर संगीत, भावनिक कथानक यांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक उत्तम समीकरण आहे आणि त्यातून नेहमीच एक अनोखा कलाविष्कार चित्रपटप्रेमींसाठी सादर होतो. अशीच सुंदर कलाकृती 'पांघरूण'च्या निमित्ताने पाहायला मिळणारा आहे. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, कोकणातील नयनरम्य निसर्गसौंदर्य आणि तिथे घडणारी अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना 'पांघरूण' मध्ये पाहायला मिळणार आहे.

‘पांघरूण’ हा चित्रपट ४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सिनेमागृहांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हेही वाचा - Why I Killed Gandhi : अमोल कोल्हे वैचारिकदृष्ट्या गद्दार निघाले संभाजी ब्रिगेड

ABOUT THE AUTHOR

...view details