महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पाहा, ग्लॅमरस 'सो'कुलचे पारंपरिक वेशभूषेतील खास फोटो

नेहमीच ग्लॅमरस लूकमध्ये दिसणाऱ्या सोनालीने आता खास पारंपरिक वेशभूषेतील फोटो शेअर केले आहेत. सोनालीने लाल साडीतील आपला एक फोटो शेअर करत 'मोहे रंग दो लाल' असे कॅप्शन दिले आहे.

'सो'कुलचा पारंपरिक वेशभूषेतील लूक

By

Published : May 17, 2019, 1:58 PM IST

मुंबई- मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. अनेकदा ती आपल्या नव्या लूकचे फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. नेहमीच ग्लॅमरस लूकमध्ये दिसणाऱ्या सोनालीने आता खास पारंपरिक वेशभूषेतील फोटो शेअर केले आहेत.

तिच्या या मराठमोळ्या लूकला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. सोनालीने लाल साडीतील आपला एक फोटो शेअर करत 'मोहे रंग दो लाल' असे कॅप्शन दिले आहे. तर दुसरा फोटो पिवळ्या रंगाच्या साडीतील असून 'किती सुंदर...हळदच जणू' असे कॅप्शन तिने दिले आहे.

'सो'कुलचा पारंपरिक वेशभूषेतील लूक

तर हा रंग तुझ्यावर उठून दिसतोय असे एका चाहत्याने कमेंटमध्ये म्हटले आहे. अनेकांनी तिच्या या फोटोला लाईक करत तिची प्रशंसा केली आहे. दरम्यान सोनाली लवकरच सलमान खानच्या 'भारत' चित्रपटातही झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, यात तिचा रोल नेमका काय असणार, हे अद्यापही गुलदस्त्याच आहे.

'सो'कुलचा पारंपरिक वेशभूषेतील लूक
'सो'कुलचा पारंपरिक वेशभूषेतील लूक

ABOUT THE AUTHOR

...view details