महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 14, 2020, 5:49 PM IST

ETV Bharat / sitara

'असं कौशल्य भारतातच असू शकतं', शंकर महादेवन यांनी शेअर केला बासरी वादकाचा खास व्हिडिओ

शंकर महादेवन यांच्यासोबत या बासरीवादकाची छान जुगलबंदी या व्हिडिओत पाहायला मिळते.

Shankar Mahadevan Share video of fluet artist from asam
'असं कौशल्य भारतातच असू शकतं', शंकर महादेवन यांनी शेअर केला बासरी वादकाचा खास व्हिडिओ


मुंबई -आपला भारत देश हा विविध कलाकौशल्यामध्ये पारंगत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात काही ना काही कलागुण असलेल्या व्यक्ती आहेत. यापैकी काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर येतात. अशा कलाकारांना जगासमोर आणण्यासाठी कलाकार मंडळी देखील समोर येत असतात. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन देखील अशा कलाकारांची भेट घेऊन त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

शंकर महादेवन यांनी अलिकडेच एका बासरी वादकासोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. हे बासरी वादक आसाम येथील असून त्यांचे नाव दिलीप हिरा, असे आहे. त्यांच्या बासरी वादनाने मंत्रमुग्ध होत शंकर महादेवन यांनी त्यांच्या बासरी वादनाचा व्हिडिओ शेअर केला.

हेही वाचा -अमिताभ बच्चनपासून ते हृतिकपर्यंत सर्वांनाच 'या' डान्सरने लावले वेड, पाहा व्हिडिओ

शंकर महादेवन यांच्यासोबत या बासरी वादकाची छान जुगलबंदी या व्हिडिओत पाहायला मिळते. नेटकऱ्यांच्याही या व्हिडिओवर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा -'गंगुबाई काठीवाडी'चं मोशन पोस्टर, आलियाने शेअर केला व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details