मुंबई -बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लवकरच आगामी 'प्रस्थानम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. संजय दत्तचा राजकीय अवतार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
'यह गद्दी विरासत से नही काबिलियत से मिलती है', 'प्रस्थानम'चा फर्स्ट लूक प्रदर्शित
देवा कट्टा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, संजय दत्तच्याच प्रोडक्शन हाऊसमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
'प्रस्थानम'चा फर्स्ट लूक प्रदर्शित
देवा कट्टा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, संजय दत्तच्याच प्रोडक्शन हाऊसमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात संजय दत्त हा 'बलदेव प्रताप सिंग' ही भूमिका साकारत आहे.
'यह गद्दी विरासत से नही काबिलियत से मिलती है', अशी दमदार टॅगलाईन या चित्रपटाच्या पोस्टरवर देण्यात आली आहे. २० सप्टेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.