महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापच्या फिल्मला मिळाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

पृथ्वीक प्रतापच्या ‘वेकअप’ या शॉर्टफिल्मला पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण विषयक वसुंधरा लघुपट स्पर्धेत हा पुरस्कार मिळाला.

पृथ्वीक प्रताप

By

Published : Jun 7, 2019, 4:40 PM IST


‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दूसऱ्या पर्वाचा विजेता अभिनेता पृथ्वीक प्रतापच्या शॉर्टफिल्मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण विषयक वसुंधरा लघुपट स्पर्धेत पृथ्वीकचा ‘वेकअप’ हा लघुपट दुसरा आला आहे.

‘झी मराठी’च्या ‘जागो मोहन प्यारे’मध्ये राहुलच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता पृथ्वीक प्रताप सोनी मराठीवरच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात ‘कॉमेडीचा जहागिरदार’ झाला. शालेय विश्वावर आधारित असलेल्या ‘बॅंकबेंचर्स’ या प्रसिध्द वेबमालिकेमुळेही तो तरूणाईत लोकप्रिय आहे.

पृथ्वीकने ‘वेकअप’ शॉर्टफिल्मच्या अगोदर ‘दि क्लोजेट’, ‘दस रूपय्या’, अशा श़ॉर्ट्सफिल्म्समध्येही काम केले आहे. तो म्हणतो, “मी कॉलेजमध्ये असल्यापासून शॉर्टफिल्ममध्ये काम करत आहे. पण वेकअप माझ्यासाठी खूप महत्वाची शॉर्टफिल्म आहे. कारण मी निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या एनजीओसोबत निगडीत आहे. त्यामुळे माझ्या आवडीच्या विषयावर बनलेल्या शॉर्टफिल्मसाठी काम करणं अर्थातच अविस्मरणीय होतं. त्यात आता आमच्या शॉर्टफिल्मला महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा मानला जाणारा पुरस्कार मिळालाय. त्यामुळे आनंद होतोय.”

टफएग स्टुडियोची अनिकेत कदम आणि तिल्लोत्तम पवार दिग्दर्शित वेकअप ही शॉर्टफिल्म, स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देणारी आहे. एकही संवाद नसलेल्या ह्या लघुपटामध्ये चेहऱ्यावरील हावभावाच्या मदतीनेच पृथ्वीकला अभिनय करायचा होता.

ABOUT THE AUTHOR

...view details