महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

भारतीय सैन्याचा अपमान केल्यामुळे पाक अभिनेत्री वीना मलिक सोशल मीडियावर ट्रोल - वीना मलिक

पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिकने मात्र, सोशल मीडियावर याबाबत एका ट्विटद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमधून तिने भारतीय सैन्याचा अपमान करत एक पोस्ट शेअर केली आहे.

भारतीय सैन्याचा अपमान केल्यामुळे पाक अभिनेत्री वीना मलिक सोशल मीडियावर ट्रोल

By

Published : Aug 5, 2019, 6:13 PM IST


मुंबई -आज ५ ऑगस्ट संपूर्ण भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे. आज जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या भारतीय संविधानातील कलम ३७० रद्द करण्यात आले आहे. यासोबतच लद्दाखचेही जम्मू काश्मीरमधून विलगीकरण करण्यात आले आहे. यावर सर्वच क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिकने मात्र, सोशल मीडियावर याबाबत एका ट्विटद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमधून तिने भारतीय सैन्याचा अपमान करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. 'To The Indian Brutality In Kashmir'अशा शब्दांसह तिने अपमानास्पद इशारा देणारा स्वतःचा फोटो पोस्ट केला आहे.

'भारतीय सैन्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही', 'तुला लाज वाटली पाहिजे', बॉलिवूडमध्ये कामाची भीक मागण्यासाठी पुन्हा येऊ नको. 'तुला आता भारतात प्रवेश नाही', अशा आशयाच्या कमेंट्स तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details