मुंबई -'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या नात्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा त्यांनी केल्यानंतर नेहमीच ही जोडी चर्चेचा विषय बनली. डिसेंबर महिन्यात दोघांनी लग्नगाठ बांधुन कायमस्वरूपी एकमेकांचा होण्याचा निर्णय घेतला. आजच्याच दिवशी ते पहिल्यांदा एकमेकांसोबत डेटवर गेले होते. तेव्हापासूनच त्यांच्यात प्रेमांकुर फुटला होता.
निक-प्रियांकाच्या नात्याला १ वर्ष पूर्ण, निकने शेअर केली रोमॅन्टिक पोस्ट
निक-प्रियांकाच्या लग्नानंतरही ही जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. त्यांचे बरेचसे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत असतात. त्याना चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया देखील मिळतात.
निकने सोशल मीडियावर प्रियांकासाठी एक खास रोमॅन्टिक पोस्ट लिहिली आहे. 'एक वर्षापूर्वी आपण ज्या व्यक्तीला, महिलेला भेटलो ती माझी खूप खास मैत्रीण, माझा आत्मविश्वास, माझी पत्नी....' असे म्हणत निकने प्रियांकाचे त्याच्या आयुष्यातील नेमके स्थान सर्वांसमोर ठेवले. आपल्यातील सर्वात चांगल्या व्यक्तीला घडवण्यात प्रेरित करण्यासाठी म्हणून त्याने प्रियांकाचे आभार मानले. तर, तिचा पती असणे ही भाग्याची आणि आदराची बाब असल्याचेही त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
निक-प्रियांकाच्या लग्नानंतरही ही जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. त्यांचे बरेचसे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत असतात. त्याना चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया देखील मिळतात. अलिकडेच 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' दोघांच्याही लूकला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक केले. चाहत्यांमध्ये 'निक्यांका' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जोडीची केमिस्ट्री खरंच एखाद्या परिकथेतील राजकन्या आणि राजकुमाराच्या कथेप्रमाणेच आहे, असे म्हणायला हरकत नाही.