महाराष्ट्र

maharashtra

हृतिक रोशनच्या ‘काबिल’ सिनेमातील अभिनेत्री करतेय मराठीत पदार्पण

66व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘हिलारो’मधल्या अभिनयासाठी नीलम पांचालला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हिंदी मालिका, नायक सिनेमातून काम केलेली नीलम आता मराठीत पदार्पण करणार आहे.

By

Published : Feb 10, 2020, 5:44 PM IST

Published : Feb 10, 2020, 5:44 PM IST

Updated : Feb 10, 2020, 8:02 PM IST

Niilam Panchal
नीलम पांचाल

काबिल सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री नीलम पांचाल आता लवकरच मराठीत पदार्पण करतेय. नुकत्याच झालेल्या 66व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आपला गुजराती चित्रपट ‘हिलारो’मधल्या अभिनयासाठी नीलमला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

इश्कबाज, वीरा, रूक जाना नहीं, हमारी देवरानी या हिंदी मालिकेत काम केलेल्या नीलम पांचालने हृतिक रोशनच्या काबिल सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सध्या हिंदी नाट्यसृष्टीत गाजणा-या भारत भाग्यविधाता या हिंदी नाटकात 'कस्तुरबा'ची भूमिका नीलम साकारत आहे. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात रजत कमल पुरस्काराने सन्मानित झालेल्या नीलम पांचालने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीयो टाकला आहे. या व्हिडीयोत ती मराठीचे धडे गिरवताना दिसत आहे. त्यामुळे तिच्या मराठी पदार्पणाविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

नीलम पांचाल

अभिनेत्री नीलम पांचालला याविषयी विचारले असता ती म्हणाली, “हो मी सध्या माझ्या मराठीसृष्टीतल्या पदार्पणाची तयारी करत आहे. मी मुंबईत राहत असल्याने आणि मराठी सिनेमांची चाहती असल्याने मराठी मला समजते. पण मला बोलता येत नाही. पण आता मराठीत पदार्पण करत असल्याने मराठीचे धडे गिरवणे सध्या सुरू आहे.”

आता हा मराठी सिनेमा आहे की वेबसीरीज, नाटक आहे की मालिका, याविषयी मात्र नीलमने काही सांगण्यास सध्या नकार दिला आहे. नीलम म्हणते, “सध्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे. मराठीतल्या एका नामवंत दिग्दर्शकाच्या प्रोजेक्टमध्ये मी काम करत आहे. आणि निर्मात्यांकडून अनाउन्समेन्ट न झाल्याने मी याविषयी जास्त रिविल करू शकत नाही.”

Last Updated : Feb 10, 2020, 8:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details