मुंबई -मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शन क्षेत्रात उतरली आहे. तिने दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट 'व्हॅलेन्टाईन्स डे'च्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. 'मन फकीरा' असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या मुख्य भूमिका आहेत.
मृण्मयीने या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करून त्यावर खास कॅप्शन दिले आहे. हा चित्रपट नातेसंबधावर आधारित असून आजची पीढी ज्या दृष्टीकोनातून नातेसंबंधाकडे पाहते, त्याबद्दलची कथा यामध्ये दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा देखील मृण्मयीनेच लिहिली आहे.