महाराष्ट्र

maharashtra

'मणिकर्णिका - द क्विन ऑफ झांशी' जपानमध्ये होणार प्रदर्शित

झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यगाथेवर हा चित्रपट आधारित होता. देशभरातच नाही, तर जगभरात त्यांची शौर्यगाथा पोहचावी, यासाठी हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चित्रपट निर्मात्यांनी सांगितले आहे.

By

Published : Dec 3, 2019, 1:18 PM IST

Published : Dec 3, 2019, 1:18 PM IST

Manikarnika: The Queen Of Jhansi
'मणिकर्णिका - द क्विन ऑफ झांशी' जपानमध्ये होणार प्रदर्शित

मुंबई - बॉलिवूडची क्विन कंगना रनौत हिचा 'मणिकर्णिका - द क्विन ऑफ झांशी' हा चित्रपट यावर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आता हा चित्रपट जपानमध्येही प्रदर्शित होणार आहे. जपानच्या प्रेक्षकांसाठी या चित्रपटाचे पोस्टरही शेअर करण्यात आले आहे.

३ जानेवारी २०२० ला हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार आहे. झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यगाथेवर हा चित्रपट आधारित होता. देशभरातच नाही, तर जगभरात त्यांची शौर्यगाथा पोहचावी, यासाठी हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चित्रपट निर्मात्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -'डंके की चोटपर बजेगा नारा', 'तान्हाजी'चं 'शंकरा रे शंकरा' गाणं प्रदर्शित


'मणिकर्णिका - द क्विन ऑफ झांशी' या चित्रपटात अतुल कुलकर्णी, सुरेश ओबेरॉय, डॅनी डेन्जोपा, अंकिता लोखंडे आणि वैभव तत्ववादी यांचीही भूमिका पाहायला मिळाली होती.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, कंगना सध्या तिच्या 'थलायवी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तिचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक आहे. हा चित्रपट २६ जून २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

याशिवात ती अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित 'पंगा' चित्रपटातही भूमिका साकारणार आहे. तसेच 'अपराजित अयोध्या' या अयोध्या मंदिर प्रकरणावर आधारित चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे.

हेही वाचा -मनालीच्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये महानायकाचं 'ब्रम्हास्त्र' शूट

ABOUT THE AUTHOR

...view details