मुंबई- अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला 'केसरी' चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यानंतर आता चित्रपटाचा खास मेकिंग व्हिडिओही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अशी झाली 'केसरी'ची शूटींग; अक्षयने शेअर केला मेकींग व्हिडिओ
अक्षय कुमारने स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटातील जबरदस्त अॅक्शन सीन कशाप्रकारे शूट केले गेले हे दाखवण्यात आले आहे.
अक्षय कुमारने स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटातील जबरदस्त अॅक्शन सीन कशाप्रकारे शूट केले गेले हे दाखवण्यात आले आहे. यात अक्षय कुमार चित्रपटातील सीनबद्दल माहिती देताना म्हणतो, चित्रपटात २ अॅक्शन सीक्वंस आहेत. एक हिमाचल प्रदेश तर दुसरा मुंबईतील वाईमध्ये चित्रीत केल्याचे त्याने यात सांगितले आहे.
अक्षयने सांगितले की, १९८७ मध्ये २१ शीख सैनिकांनी हार पत्करण्यापेक्षा लढून मृत्यूस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे १० हजार अफगाणांसोबत लढाई केली. हीच लढाई पुन्हा एकदा चित्रीत करण्यासाठी त्यावेळचे काही प्रकार शिकायला लागले, जे फार कठीण होतं. केसरीचं दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले आहे. येत्या २१ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.