महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कमल हासन लढवणार तामिळनाडू विधानसभा निवडणूक!

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत अभिनेता कमल हासन यांनी दिले आहेत. यासाठी रजनीकांत यांचेही सहकार्य घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By

Published : Nov 6, 2020, 4:13 PM IST

Kamal Haasan
कमल हासन

चेन्नई- पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे अभिनेता कमल हासनने म्हटले आहे. यासाठी सुपरस्टार रजनीकांत यांचे सहकार्यही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मक्कल सुधी माइम (एमएनएम) पक्षाच्या वतीने कमल हासन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पुढच्या वर्षी मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

कमल हासन म्हणाले की, रजनीकांत यांच्याशी ते राजकारणाविषयी चर्चा करीत आहेत. त्यांनी राजकीय भूमिकेबाबत निर्णय घ्यायला हवा, असेही ते म्हणाले.

मक्कल सुधी माइम (एमएनएम) पक्षाचे राजकारण आरोप करण्यासाठी किंवा सूडबुद्धीचे असणार नाही. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही कमल हासन यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details