मुंबई -बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे, अमित सध आणि जिम सर्भ हे तिघेही लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. 'वजीर' चित्रपटाचे दिग्दर्शक बेजॉय नंबैर यांच्या आगामी 'तैश' या चित्रपटात तिघेही भूमिका साकारणार आहेत.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'तैश' चित्रपटाचे शूटिंग इंग्लंड येथे जुलै महिन्यापासून सुरू होणार आहे. हर्षवर्धन राणे, अमित सध आणि जिम सर्भ हे तिघेही या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत कोणती अभिनेत्री भूमिका साकारणार आहे, हे अद्याप जाहीर करण्यात आले नाही. मात्र, नेहा शर्मा ही यामध्ये भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट रिवेंज ड्रामा राहणार आहे.
हर्षवर्धन राणे, अमित सधसह जिम सर्भ येणार एकत्र, 'या' चित्रपटात साकारणार भूमिका
हर्षवर्धन 'सनम तेरी कसम' या चित्रपटानंतर बऱ्याच काळापासून चित्रपटापासून लांब होता. जिम सर्भ हा 'पद्मावत' या चित्रपटात झळकला होता. तर अमित संधने सलमान खानसोबत 'सुलतान' चित्रपटात भूमिका साकारली होती. आता तिघेही 'तैश' चित्रपटात काय कमाल दाखवतात, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
बिजॉय या चित्रपटाच्या कथेवर बऱ्याच दिवसापासून काम करत होते. त्यांनी यापूर्वी इरफान खान, दुलकर सलमान आणि मिथिला पालकर यांचया 'कारवां' चित्रपटाची कथा लिहिली आहे. 'तैश' चित्रपटाची निर्मिती निशांत पिट्टी आणि बिजॉय नंबैर हेच करणार आहेत.