महाराष्ट्र

maharashtra

ह्रतिक रोशन कुटुंबीयांनी मांडलाय सुनैनाचा छळ, रंगोली चंडेलचा आरोप

ह्रतिक रोशनच्या कुटुंबीयांकडून सुनैना रोशनचा छळ केला जात असल्याचे ट्विट कंगना रानावतची बहिण रंगोली चंडेल हिने केले आहे. सुनैना सतत रडत असून ती आपले दुःख कंगनाला सांगत असते असेही तिने म्हटलंय.

By

Published : Jun 25, 2019, 4:45 PM IST

Published : Jun 25, 2019, 4:45 PM IST

कंगना रानावत आणि तिची बहिण रंगोली चंडेल


मुंबई - अभिनेता ह्रतिक रोशन आणि त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला करण्याची एकही संधी कंगना रानावतची बहिण रंगोली चंडेल सोडत नाही. ह्रतिकच्या बहिणीला मारहाण होत असून रोशन कुटुंबीय तिचा छळ करीत असल्याचे ट्विट तिने मंगळवारी केले आहे.

रंगोलीने शेअर केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, सुनैना रोशन सतत रडत असते. ती रंगोलीच्या संपर्कात असून मीडियाशी बोलल्यानंतर सुनैनाने आपला फोन स्वीच ऑफ केलेला आहे.

"गेली महिनाभर सुनैना कंगनाशी प्रत्येक दिवशी बोलत असते. ती माझ्याशी बोलली आणि सतत रडत होती. मीडियाशी बोलल्यानंतर तिचा फोन स्वीच ऑफ झालाय. तिच्या कुटुंबीयांनी तिला मारहाण केली असून ते छळ करीत असल्याचे ती म्हणाली. मी हताश झाले असून काय करावे समजत नाही.", असे रंगोलीने ट्विटमध्ये म्हटले आहे.

गेल्या आठवड्यातही असेच आरोप रंगोलीने केले होते. सुनैना एका मुस्लीम मुलाच्या प्रेमात असल्यामुळे घरचे लोक तिचा छळ करीत असल्याचे तिने म्हटले होते. यासाठी ती कंगनाची मदत घेत असल्याचेही तिने म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details