मुंबई :२०१८ला आलेल्या 'बधाई हो' चित्रपटाचा दुसरा भाग आता लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव हे दोघे या चित्रपटात एकत्र दिसतील. 'जंगली पिक्चर्स'ने मार्चमध्येच या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर आता याच्या चित्रिकरणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
जानेवारी २०२१मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे. भूमी पेडणेकरने याबाबत माहिती दिली. राजकुमार राव, आणि जंगली पिक्चर्सना टॅग करत तिने लवकरच सेटवर भेटू, अशा आशयाची पोस्ट केली आहे. यासोबतच तिने राजकुमार राव याच्यासोबतचा आपला एक फोटोही पोस्ट केला आहे, ज्यात ते दोघे हस्तांदोलन करताना दिसत आहेत.