मुंबई -सुप्रसिद्ध शायर कैफी आझमी यांचा आज १०१ वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलद्वारे खास डूडल तयार करण्यात आले आहे. या डूडलद्वारे गुगलने कैफी आझमी यांनी आदरांजली वाहिली आहे.
कैफी आझमी हे कवी, गीतकार आणि पटकथालेखक म्हणून प्रसिद्ध होते. २० व्या शतकातील ते सुप्रसिद्ध कवी म्हणून ओळखले जात होते.
प्रेम कवितांपासून ते बॉलिवूडच्या गाण्यापर्यंत तसेच चित्रपटांच्या कथा लिहिण्यात कैफी आझमी यांचा हात कोणीही पकडू शकत नव्हते.
कैफी आझमी यांचा जन्म आजमगढ येथे झाला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी पहिली कविता लिहिली होती. पुढे ते उर्दू वृत्तपत्रात काम करण्यासाठी मुंबईला गेले होते. त्यांचा पहिला कवितासंग्रह 'झंकार' हा १९४३ साली प्रकाशित झाला होता. त्यानंतर ते लेखक संघाचे सदस्य बनले होते. त्यांनी समाजाच्या आर्थिक विकासासाठी आपल्या लेखनाचा वापर केला.