मुंबई -काही कलाकार हे स्वतःच इतके मिश्किल स्वभावाचे असतात की त्यांच्या सोबत घडलेले किस्से देखील तितकेच धमाल असतात. त्यात आवर्जून उल्लेख करावा असे कलाकार म्हणजे संजय मोने आणि संजय नार्वेकर. 'हे तर काहीच नाय' या कार्यक्रमातून कलाकार मजेदार किस्से सांगून प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करतात त्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आवडता आहे. येत्या आठवड्यात ‘हे तर काहीच नाय’ च्या मंचावर संजय मोने स्वतः प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहेत. पण त्यांचे किस्से हे न संपणारे आहेत त्यामुळे उपस्थित कलाकारांपैकी गिरीश ओक यांनी देखील संजय मोने यांचे किस्से सांगून सगळ्यांना हसवून लोटपोट केलं.
गिरीश ओक, अतुल परचुरे, संजय मोने यांच्या सोबतच आगामी भागात अदिती सारंगधर, मनसे नेता संदीप देशपांडे आणि मेघा घाडगे हे कलाकार देखील या मंचावर येणार असून त्यांच्या किश्यांची मैफल भरणार आहे. त्यामुळे या भागातील सर्व धमाल, मजा मस्ती अनुभवताना प्रेक्षकांना धमाल येणार आहे.
अतुल परचुरे, अदिती सारंगधर, मेघा घाडगे आणि गिरीश ओक व संजय मोने येताहेत 'हे तर काहीच नाय'च्या मंचावर!
‘हे तर काहीच नाय’ या कार्यक्रमातून गिरीश ओक, अतुल परचुरे, संजय मोने अदिती सारंगधर, मनसे नेता संदीप देशपांडे हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात चाहत्यांना सर्व धमाल, मजा मस्ती अनुभवता येणार आहे. गिरीश ओक आणि संजय मोने हे एकदा बांद्रा वरून माहीमला जात असताना त्यांच्यासोबत काय घडले हा किस्सा त्यांनी यावेळेस प्रेक्षकांसोबत शेयर केला.
काय पहाण्यास मिळणार या वेळेस एपिसोडमध्ये
गिरीश ओक आणि संजय मोने हे एकदा बांद्रा वरून माहीमला जात होते तेव्हा पोलिसांनी त्यांची गाडी थांबवली. त्यावेळी पोलीस आणि मोने यांच्यातील विनोदी संभाषण गिरीश ओक यांनी सांगितलं, तसेच गिरीश ओक यांच्या नावावर संजय मोने पुण्यातील एक किस्सा नेहमी सगळ्यांना सांगतात, तो किस्सा नेमका कुठला हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. तर अतुल परचुरे यांनी संजय नार्वेकर यांच्यासोबतचे किस्से सांगितले. अतुल परचुरे आणि संजय नार्वेकर एकदा बाईकवरून जात असताना बाईक चालवत असलेल्या अतुलचे डोळे भर ट्रॅफिकमध्ये बंद केले आणि त्यांना बाईक चालवायला सांगितली. असे अनेक किस्से या भागांतून अनुभवायला येणार आहेत.
हेही वाचा -नार्को क्वीन’ शशिकला पाटणकर ची बायोपिक आणतोय दिग्दर्शक समित कक्कड!