महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘पीव्हीआर’ तर्फे ‘एफडब्ल्यूआयसीई’च्या ५ लाख नोंदणीकृत सदस्यांसाठी मोफत लसीकरण!

‘पीव्हीआर’ आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयीजमधील (एफडब्ल्यूआयसीई) कर्मचाऱ्यांचे नानावटी मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या सहयोगाने लसीकरण करणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कलावंत, स्पॉट-बॉइज, लाइट-मेन, सेटिंग-वर्कर्स, ज्युनियर आर्टिस्ट्स, मेक-अप आर्टिस्ट्स, स्टण्टमेन, बॅकग्राउंड डान्सर्स आदींचे लसीकरण करून घेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

Free vaccination
मोफत लसीकरण!

By

Published : Jul 20, 2021, 10:24 PM IST

कोरोना महामारीने आतंक माजविलेला असताना त्यावर तोडगा काढला गेला आणि भारतासकट जागतिक पातळीवर लसनिर्मिती करण्यात आली. आपल्या देशामध्ये लसीकरण मोहीम राबविली जात असली तरी लोकसंख्या आणि लस उत्पादन यांचा मेळ बसताना कठीण पडत असल्यामुळे अनेकांचे लसीकरण व्हायचे राहून गेले आहे. मनोरंजनसृष्टीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यात काम करणाऱ्यांचे लसीकरण करण्याचे मनावर घेतले आहे मल्टिप्लेक्स ‘पीव्हीआर’ या कंपनीने. ‘पीव्हीआर’ आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयीजमधील (एफडब्ल्यूआयसीई) कर्मचाऱ्यांचे नानावटी मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या सहयोगाने लसीकरण करणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कलावंत, स्पॉट-बॉइज, लाइट-मेन, सेटिंग-वर्कर्स, ज्युनियर आर्टिस्ट्स, मेक-अप आर्टिस्ट्स, स्टण्टमेन, बॅकग्राउंड डान्सर्स आदींचे लसीकरण करून घेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

हा उपक्रम ‘पीव्हीआर केअर’ कार्यक्रमाचा भाग आहे. कोविड-१९ साथीनंतरच्या जगासाठी सुधारित सुरक्षितता उपक्रम व प्रक्रियांचा पीव्हीआर केअरमध्ये समावेश होतो. याद्वारे ग्राहक, कर्मचारी व चित्रपट उद्योगातील अन्य संबंधितांच्या आरोग्य व कल्याणाची निश्चिती केली जात आहे. लसीकरण हा सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे आणि कामकाज व व्यवहार पूर्वपदावर आणण्याच्या तसेच पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत महत्त्वाचे पीव्हीआर केअर उपक्रम चित्रपट उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहेत.

पहिले लसीकरण शिबीर मुंबईतील जुहू येथील डायनॅमिक्स मॉलमधील पीव्हीआर सिनेमाजमध्ये आयोजित करण्यात आले होते आणि नंतर या कार्यक्रमाचा विस्तार केला जाणार आहे. वॉक-इन पद्धतीने घटनास्थळीच लसीकरणासाठी नोंदणी करून घेतली जात होती व लसीकरण पूर्णपणे मोफत होते. पीव्हीआर ऑपरेशन स्टाफने लॉजिस्टिक्स, मनुष्यबळ सहाय्य, रांगांचे व्यवस्थापन यांत मदत केली तर कामगारांची को-विन पोर्टलवर नोंदणी करणे व त्यांचे लसीकरण यांसह सर्व वैद्यकीय सहाय्य नानावटी मॅक्स सुपर स्पेशॅलिटीच्या कर्मचाऱ्यांनी केले.

मुंबईतील चित्रपट उद्योगातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम राबवणारी ‘पीव्हीआर’ ही पहिली मल्टिप्लेक्स कंपनी आहे. पीव्हीआर लिमिटेड या सर्वांत मोठ्या चित्रपट प्रदर्शन कंपनीने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयीज (एफडब्ल्यूआयसीई) या संघटनेकडे नोंदणी असलेल्या चित्रपट उद्योगातील कामगारांसाठी ऑन-साइट शिबिरे आयोजित करून लसीकरण मोहीम अधिक व्यापक केली आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेला सहाय्य करण्यासाठी पीव्हीआरने मुंबईतील चित्रपट उद्योगातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत लसीकरण मोहीम नानावटी मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या सहयोगाने सुरू केली आहे.

पीव्हीआर लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. अजय बिजली या उपक्रमाबद्दल म्हणाले, ‘’चित्रपट उद्योगाला व चित्रपटसृष्टीला पूर्वपदावर आणण्यासाठी लसीकरण हीच गुरूकिल्ली आहे. यात आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि आम्हाला चित्रपट उद्योगातील कामगारांच्या प्राणांचे रक्षण करणारे दूत म्हणून काम करण्याची इच्छा आहे. सरकार राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेसाठी करत असलेल्या प्रयत्नांचे आम्ही प्रशंसक आहोत आणि चित्रपट उद्योगातील सीमांत कामगारांचे लसीकरण करून आम्ही आमचा वाटा उचलत आहोत. एफडब्ल्यूआयसीईमधील रोजंदारी कामगारांसाठी मोफत लसीकरण मोहिमेचा विस्तार करणे हे या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.”

लसीकरण मोहीम ऑन-ग्राउंड टीम्सशी समन्वय राखून तसेच सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून व मास्क-सॅनिटायजर्सच्या वापरासारखे सुरक्षितता नियम पाळून जुहूतील डायनॅमिक्स मॉलमधील पीव्हीआर सिनेमाजमध्ये अखंडितपणे सुरू ठेवली जाईल असे घोषित करण्यात आले आहे.

हेही वाचा - Viral video: कपीलचा राज कुंद्राला प्रश्न, ''बिन काही करता पैसे कसे कमवता?''

ABOUT THE AUTHOR

...view details