महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अरिजीत सिंगच्या गाण्यावर रोहित शेट्टीने शेअर केला सुंदर व्हिडिओ

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी एक सकारात्मक विचार करायला लावणारा व्हिडिओ रोहित शेट्टीने पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या अखेरीस जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधीचे भारतीयांना आवाहन आहे.

By

Published : Mar 27, 2020, 7:26 PM IST

Rohit Shetty
रोहित शेट्टीने शेअर केला सुंदर व्हिडिओ

मुंबई - देशभर सुरू असलेल्या लॉक डाऊनमुळे मुंबई शहर ओस पडले आहे. कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी पुकारलेल्या या युद्धात प्रत्येक नागरिक सहभागी झाला. घरात राहूनच आपण कोरोना विषाणूचा पराभव करू शकतो, याला लोक प्रतिसाद देत आहेत.

रोहित शेट्टी पिक्चर्सच्या वतीने एक सुंदर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. यात मुंबईतील सर्व गर्दीची ठिकाणे मनुष्यरहित असल्याचे दिसते. वॉर अगेन्स्ट कोरोना असे हॅशटॅग करीत ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय.

या व्हिडिओत 'सिम्बा' चित्रपटातील लोकप्रिय 'बंदेया रे बंदेया' हे अरिजीत सिंगने गायलेले गाणे आहे. कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी एक सकारात्मक विचार करायला लावणाऱ्या या व्हिडिओच्या अखेरीस जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधीचे भारतीयांना आवाहन आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details