मुंबई- अभिनेता गुलशन देवैया म्हणतो की, बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शनचा वाद असो की, नेपोटिझ्मचा वाद, याचा त्याला काहीही फरक पडत नाही.
बॉलिवूडमध्ये निष्ठाहीन लोक आवाज उठवतात - गुलशन देवैया
बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या वादाचा आपल्यावर फरक पडत नसल्याचे अभिनेता गुलशन देवैयाने म्हटले आहे. मात्र निष्ठाहीन लोक आवाज उठवत असल्याचा त्रास होतो, असेही त्याने म्हटलंय.
"नाव न घेता, मला असे म्हणायचे आहे की, अलीकडच्या काळात आपल्या चित्रपटसृष्टीत बदनामी करणारे वाद मला त्रास देत नाहीत. निष्ठाहीन लोक आवाज उठवत आहेत, या गोष्टीचा मला त्रास होतो. तुम्ही फिल्म उद्योगातील प्रभावी आवाज आहात, असे वाटत असेल तर, तुम्ही बोलण्यापूर्वी शब्दांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे मला अशा लोकांवर विश्वास ठेवायचा त्रास होतो. जे प्रेक्षक या विषयाकडे पाहात आहेत, त्यांनी या वादाचा कुणाला फायदा आहे, याचा विचार केला पाहिजे.''
गुलशनने करमणूक उद्योगात आपला ठसा उमटविला आहे. त्याने 'शैतान', 'हेट स्टोरी', 'गोलियां की रसलीला : राम-लीला', आणि 'ए डेथ इन द गुंज' अशा चित्रपटातून प्रभावी भूमिका साकारल्या होत्या. त्याने 'स्मोक' आणि 'अफसोस' सारख्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. गुलशनचा नवा चित्रपट 'फूटफेरी' २४ ऑक्टोबरला एंड पिक्चर्सवर रिलीज होईल.