मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरच्या जीवलग मैत्रिणीचे निधन झाले आहे. अॅनाबेल असे तिच्या मैत्रीणीचे नाव आहे. खुद्द कनिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही दु:खद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
कनिकाने इन्स्टाग्रामवर आपल्या मैत्रिणीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे. 'माझ्या बहिणीचे निधन झाले आहे. देव तिच्या आत्म्यास शांती देवो. मी माझे दु:ख शब्दांमध्ये नाही सांगू शकत नाही. हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस आहे.'