महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Pranitha Marriage: अभिनेत्री प्रणिता सुभाषने बिझनेसमन नितीन राजूसोबत केले गुपचुप लग्न

बहुभाषिक अभिनेत्री प्रणिता सुभाषने उद्योजक नितीन राजू यांच्यासोबत एक रिसॉर्टवर लग्न केले आहे. या जोडीने लग्न थाटामाटात करण्याचे नियोजन केले होते. मात्र वाढत्या कोरोना संक्रमणामुळे हा बेत बदलला आणि साध्या पध्दतीने विवाह पार पडला.

By

Published : May 31, 2021, 4:51 PM IST

Updated : May 31, 2021, 5:20 PM IST

Actress Pranita Subhash
अभिनेत्री प्रणिता सुभाष

बंगळूरू- अभिनेत्री प्रणिता सुभाष हिने रविवारी उद्योजक नितीन राजू यांच्याशी विवाह केला. या विवाह सोहळ्याला नातेवाई आणि मित्र असे मोजकेच लोक सहभागी झाले होते.

प्रणिताच्या मित्राने तिच्या लग्नाचे फोटोसोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर ही बातमी फिल्म इंडस्ट्रीत चर्चेचा विषय बनली. या जोडीने लग्न थाटामाटात करण्याचे नियोजन केले होते. मात्र वाढत्या कोरोना संक्रमणामुळे हा बेत बदलला आणि साध्या पध्दतीने कनिकापुरा रोडवरील रिसॉर्टमध्ये विवाह पार पडला.

प्रणिता सुभाषने बिझनेसमन नितीन राजूसोबत केले लग्न

प्रणिता सुभाष आणि नितीन राजू म्हणाले की, “ आमचे लग्न ३० मे २०२१रोजी अत्यंत जिव्हाळ्याच्या समारंभात झाले आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद वाटतो. आम्ही अंतिम तारखेविषयी आपल्याला माहिती न दिल्याबद्दल खेद आहे. सध्याच्या कोविड प्रतिबंधांमुळे लग्न केव्हा होईल याबद्दल आम्हाला खात्री नव्हती."

नवीन जोडपे पुढे म्हणाले, ''आमच्या प्रियजनांना या सोहळ्यात सहभागी करु शकलो नाही याबद्दल दिलगिर आहोत. तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात आणि जेव्हा परिस्थिती बदलेल तेव्हा एकत्र सेलेब्रिशन करू अशी आशा करतो."

प्रणिता सुभाष ही कन्नड आणि तेलुगु भाषेतील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने सगुणी आणि मास्स या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. ती लवकरच 'भूज : द प्राईड ऑफ इंडिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि अजय देवगण यांच्या भूमिका आहेत.

हेही वाचा - महानायक अमिताभ बच्चन यांनाही श्री विठ्ठलच्या भक्तीचा लळा

Last Updated : May 31, 2021, 5:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details