महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 2, 2021, 7:57 PM IST

ETV Bharat / sitara

Video : कोण पाहातच नाही अशा अविर्भावात विक्की कौशल

आपल्या व्यायामाची झलक नियमितपणे शेअर करणाऱ्या विकी कौशल याने आपल्या डान्स कौशल्याची झलकही दाखवली आहे. त्याच्या या डान्स व्हिडिओची चर्चा फॅन्समध्ये रंगली आहे.

vicky kaushal viral video
विक्की कौशल

मुंबई - बॉलीवूड अभिनेता विक्की कौशल त्याच्या उत्कृष्ठ अभिनय कौशल्यासाठी ओळखला जातो. तितकेच त्याचे नृत्य कौशल्यही बेजवाब आहे. अलिकडेच त्याने इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्याला कोणीही पाहात नसल्याच्या अविर्भावात तो यात डान्स करताना दिसतो.

इन्स्टाग्राम स्टोरीजवर विक्कीने हॉटेलच्या खोलीतील दोन व्हिडिओ शेअर केले. अल्जेरियन कलाकार खालिदच्या 90 च्या चार्टबस्टर दीदी या गाण्यावर विक्की नाचताना दिसत आहे. विक्कीने त्याची स्टायलिस्ट अमनदीप कौर आणि सेलिब्रिटी सल्लागार प्रियांगी शाह छाब्रिया यांनाही टॅग केले आहे. तेदेखील या नृत्याचा आनंद घेत आहेत.

विक्की कौशल डान्स व्हिडिओ

आदल्या दिवशी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता विक्की कौशलने फोटो शेअरिंग अॅप्लिकेशनवर वजन उचलतानाचा एक फोटो पोस्ट केला होता. आपले शरीरसौष्ठव नीट ठेवण्यासाठी तो किती मेहनत करतोय हे त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरुन स्पष्ट दिसत आहे.

विक्की कौशल आगामी द इम्मॉर्टल अश्वथामा या चित्रपटासाठी कठोर मेहनत करीत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर करीत आहेत. याशिवाय विक्की सरदार उध्दम सिंह, तख्त आणि सॅम बहादूर या चित्रपटामध्येही दिसणार आहे.

हेही वाचा - अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ आता दिसणार 3D मध्ये!

ABOUT THE AUTHOR

...view details