महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्राण यांचा १०० वा जन्मदिवस : प्राण यांना अ‌ॅक्टर नाही 'या' क्षेत्रात करायचे होते करिअर

प्राण किशन सिकंद अर्थात बॉलिवूडचे सर्वश्रेष्ठ खलनायक प्राण यांचा आज १०० वा जन्मदिवस आहे. त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत ७०हून अधिक वर्षे घालवून ४००हून अधिक चित्रपटात अभिनय केला आहे.

Pran 100 th birthday
प्राण यांचा १०० वा जन्मदिवस

By

Published : Feb 12, 2020, 1:24 PM IST

खलनायक म्हणून प्राण यांच्या भूमिका गाजल्या असल्या तरी त्यांनी इतरही प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. त्यांचानूरजहान हिच्याबरोबर खानदान या चित्रपटात १९४२ साली केलेल्या नायकाच्या भूमिकेपासून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेशझाला. प्राण यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोरमध्ये तयार झालेल्या १७ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

प्राण यांचा १०० वा जन्मदिवस

प्राण यांचे वडील कंत्राटदार असल्यामुळे गावोगावी फिरत असत. प्राण हे रामपुरी चाकूसाठी प्रसिद्ध असलेल्या रामपूर येथून मॅट्रिक पास झाले. पुढे न शिकता त्यांनी दिल्लीत कॅनॉट प्लेसजवळील दास फोटोग्राफी स्टुडिओ या दुकानात नोकरी धरली. दाससाहेबांनी लाहोरला दुकानाचीशाखा काढली आणि प्राणला तेथे नेमले. दुकानातले काम संपले की एका ठरावीक उपहारगृहात प्राण आणि त्यांच्या मित्रांची मैफिल रंगायची.

प्राण यांचा १०० वा जन्मदिवस

एके दिवशी मुमताज शांती या त्या काळच्या आघाडीच्या अभिनेत्रीचे पती आणि दलसुख पंचोली या चित्रपट निर्मात्याचे पटकथा लेखक वली हे प्राणच्या टेबलाजवळ आले आणि त्यांनी त्याला चित्रपटात काम देण्याची पक्की ऑफर दिली. दुसर्‍या दिवशी स्टुडिओत यायला सांगितले. मात्र, प्राणसाहेबांनी या संधीकडे दुर्लक्ष केले. त्यांना चित्रपटात काम करण्याची मुळीच हौस नव्हती. नोकरीत मिळणारे २०० रुपये त्यांना पुरेसे वाटत होते. आठ दिवसांनी परत वली प्राणला भेटले, त्याला खूप बोलले आणि स्टुडिओत का आला नाहीस म्हणून जाब विचारला. प्राणसाहेब म्हणाले "मला काय माहीत की ही ऑफर खरी आहे?" मात्र त्यांनी दुसर्‍या दिवशी स्टुडिओत यायचे कबूल केले. पंचालींसमोर उभे राहिल्याबरोबर त्यांनी प्राणला ’जट यमला’या पंजाबी सिनेमासाठी करारबद्ध केले आणि हातावर आगाऊ म्हणून ५० रुपये ठेवले.

प्राण यांचा १०० वा जन्मदिवस

’जट यमला’ आणि ’खानदान’ या चित्रपटात त्यांच्या मते कशातरी भूमिका केल्यावर प्राणसाहेबांचा भाव वाढला आणि त्यांना चित्रपटाचे पाच हजार आणि पुढे नऊ हजार मिळू लागले.

प्राण यांचा १०० वा जन्मदिवस

भारताची फाळणी झाली आणि प्राण यांना मुंबईत यावे लागले. पुढचे ३०० दिवस प्राण बेकार होते आणि एके दिवशी त्यांना देव आनंद नायक असलेल्या ’जिद्दी’मध्ये काम मिळाले. फक्त ५०० रुपये एकूण रकमेचा करार आणि त्यातले १०० रुपये आगाऊ मिळाले. १९४८मध्ये प्रकाशित झालेल्या त्या ’जिद्दी’मध्ये प्राणसाहेबांनी खलनायकाची अशी जिद्दीने भूमिका केली, की त्यांच्यापुढे चित्रपटांची रांग लागली. अपराधी (नायिका मधुबाला), बडी बहन या चित्रपटांनंतर, ’बहार’पासून प्राणसाहेबांनी आपल्या कामाकडे गांभीर्याने बघायला सुरुवात केली.

प्राण यांचा १०० वा जन्मदिवस

दिलीप कुमार, राज कपूर, अशोक कुमार, बलराज सहानी यांच्याबरोबर काम करताना आपले शिक्षण आणि वाचन कमी असल्याचे प्राण यांना जाणवले. आपल्याला रंगमंचावर काम करण्याचा अनुभव नाही. त्यामुळे या नायकांबरोबर टिकून राहायचे असेल, तर खूप मेहनत केली पाहिजे आणि आपल्या भूमिकेत वेगळेपणा आणला पाहिजे याची त्यांनी खूणगाठ बांधली. मग ते पटकथा लेखकांशी आणि दिग्दर्शकांशी चर्चा करून भूमिका समजावून घेऊ लागले आणि आपल्या परीने त्यात लकबींचा वापर करू लागले.

प्राण यांचा १०० वा जन्मदिवस

’जिस देश में गंगा बहती है’ मध्ये राकाच्या मनातली फाशीची भीती दाखवणारी गळ्यावरून बोट फिरवायची त्यांची लकब राज कपूरला खूप आवडली. अशाच वेगवेगळ्या लकबी त्यांच्यातील खलनायकाने चित्रपटांमधून वापरल्या.

प्राण यांचा १०० वा जन्मदिवस

प्राणसाहेबांनी हिंदी चित्रपटांतील खलनायकाला ’स्टार’ बनवले. राजेश खन्ना यांच्यासारख्या सुपरस्टारबरोबर त्याच्या बेशिस्तपणामुळे काम न करण्याची प्रतिज्ञा प्राण यांनी शेवटपर्यंत पाळली.

प्राण यांचा १०० वा जन्मदिवस

देशाच्या फाळणीला काँग्रेस जबाबदार आहे, असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांना काँग्रेस या राजकीय पक्षाचा प्राण यांना अतिशय राग होता. त्या पक्षाच्या इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीविरुद्ध त्यांनी देव आनंद आणि विजय आनंद या बंधूंना घेऊन चित्रपट कलाकारांचा राजकीय पक्ष काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details