महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'तुम आज भी मेरे पास हो माँ', मदर्स डेच्या निमित्ताने अमिताभने गायलं भावनिक गाणं

आईचं मुलाच्या जीवनातील महत्त्व आणि जीवनातील प्रत्येक गोष्टीसोबत तिची केलेली तुलना या गाण्यात पाहायला मिळते. मदर्स डे दिवशी विशेष करून ऐकावं, असं आणि विचार करायला भाग पडणारं हे गाणं श्रोत्यांच्याही पसंतीस उतरत आहे.

मदर्स डेच्या निमित्ताने अमिताभने गायलं भावनिक गाणं

By

Published : May 11, 2019, 2:57 PM IST

मुंबई- १२ मे हा दिवस मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. याच खास दिवसाच्या निमित्ताने अमिताभ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक गाणं शेअर केलं आहे. या गाण्यातील अमिताभ यांचे बोल ऐकून कोणीही भावूक होईल. तुम आज भी मेरे पास हो माँ असे या गाण्याचे बोल आहेत.

या गाण्याला अमिताभसोबतच अनुज गर्ग यांच्या लहान मुलाने आवाज दिला आहे. तर पुनित शर्मा यांनी गाण्याचे बोल लिहिले असून शुजित सरकार यांनी हे गाणं कंपोज केलं आहे. या गाण्यातून अमिताभ बच्चन यांनी आपल्या आईला म्हणजेच तेजी बच्चन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आईचं मुलाच्या जीवनातील महत्त्व आणि जीवनातील प्रत्येक गोष्टीसोबत तिची केलेली तुलना या गाण्यात पाहायला मिळते. मदर्स डे दिवशी विशेष करून ऐकावं, असं आणि विचार करायला भाग पडणारं हे गाणं श्रोत्यांच्याही पसंतीस उतरत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details