मुंबईःअभिनेता ताहिर राज भसीनने अलीकडे शेअर केले की तो आमीर खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीपासून प्रेरणा घेऊन काम करतो. त्यांनी आपल्यावर संस्कार केल्याचे तो मानतो. ताहिर म्हणाला की, मी ज्यांना माझे मेंटॉर मानतो ते दररोज माझ्यासोबत नसतात, पण त्यांनी दिलेले संस्कार माझ्यासोबत नेहमी असतात.
मर्दानी हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाच्या रिलीजनंतर आमीर खानने त्याला दिलेला सल्ला आजही स्मरणात आहे.
याबद्दल बोलताना ताहिर म्हणाला, ''मर्दानी चित्रपटानंतर मला आमीर खान यांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा छोट्याशा भेटीत तो मला म्हणाले की, कधीच घाई करु नको आणि संधी मिळवताना कधीही घाबरु नकोस.''