मुंबई (महाराष्ट्र)- बॉलिवूड सेलेब्रिटींमध्ये सध्या लग्नसराई जोरात असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे सिंगल असलेल्या कलाकारांबद्दल ते कधी लग्न करणार, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडत असतो. असाच प्रश्न सोनालीच्या चाहत्यांनाही पडलेला दिसतोय.
मिश्कील स्वभावासाठी ओळखल्या जाणार्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला असाच एक प्रश्न चॅटच्या दरम्यान विचारण्यात आला होता. अशा प्रश्नांना 'खामोश' कसे करायचे हे तिला चांगलेच माहित आहे. ''आस्क मी ए क्वश्चन'' या इन्स्टाग्राम चॅट सेशलनमध्ये तिला एका युजरकडून हा प्रश्न विचारण्यात आला. एका सोशल मीडिया युजरने लिहिले, "मॅम प्रत्येकजण लग्न करत आहे तुम्ही लग्न कधी करणार?"