महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नेटकऱ्यांनी सोनाक्षीला विचारले रामायणाचे प्रश्न, अभिनेत्री म्हणते...

सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने सोनाक्षीने इंस्टाग्रामवर चॅट सेशन आयोजित केले होते. या माध्यमातून तिने चाहत्यांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले होते.

By

Published : Apr 18, 2020, 12:38 PM IST

sonakshi sinha answer to trollers on social media
नेटकऱ्यांनी सोनाक्षीला विचारले रामायणाचे प्रश्न, अभिनेत्री म्हणते...

मुंबई -अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा केबीसीमधील एका भागानंतर प्रचंड ट्रोल झाली होती. या भागात तिला रामायणावर आधारित प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, सोनाक्षी त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नव्हती. यावरून आताही तिची सोशल मीडियावर खिल्ली उडविली जाते.

सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने सोनाक्षीने इंस्टाग्रामवर चॅट सेशन आयोजित केले होते. या माध्यमातून तिने चाहत्यांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले होते. त्यांनतर तिला एका पाठोपाठ एक सर्व रामायण आणि महाभारत यावर आधारित प्रश्नच विचारण्यात येऊ लागले. या प्रश्नांवर सोनाक्षीने सडेतोड उत्तर देत खिल्ली उडवणाऱ्यांना गप्प केले.

एका युजरने तिला विचारले की संजीवनी औषधी कोण घेऊन आले होते. याचे उत्तर देताना सोनाक्षीने लिहिलं, की 'सध्या दूदर्शनवर रामायण आणि महाभारत पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दूरदर्शनवर मिळतील'. सोनाक्षीने आपल्या उत्तरामध्ये हनुमानाचा फोटो देखील वापरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details